… आता जगभरातील अर्थव्यवस्थेला येणार ‘अच्छे दिन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आर्थिक मंदीने त्रस्त असणाऱ्या जगभरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खासगी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, जगभरातील सेंट्रल बँकांनी व्याजदरात कपात केल्याने आणि चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्धाला विराम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने मंदीतून दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बातमीमुळे आशिया खंडातील शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली असून रोज नवीन उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात अर्थव्यवस्था रुळावर येणार असून जगभरातील करोडो नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

सिंगापूरमधील स्टॅंडर्ड चार्टर्ड पीएलसीचे प्रमुख अर्थशास्त्रज्ञ डेविड मन यांनी म्हटले आहे कि, यावर्षी अर्थव्यवस्था खूप वाईट स्थितीत होती. मात्र पुढील वर्षी हि स्थिती सुधारणार असून अनेक कारणांमुळे यामध्ये बदल घडणार आहेत. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात जास्त नोकऱ्या निर्मिती आल्याचे देखील आढळून आले आहे.

1) ब्रेक्जिट ची चिंता दूर
ब्रिटनमध्ये आणि युरोपियन युनियनमध्ये सुरु असलेल्या ब्रेक्जिटच्या प्रक्रियेमुळे सध्या अर्थव्यवस्था डगमगली असून पुढील वर्षी याची प्रक्रिया संपणार असल्यान अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. जर्मनीमध्ये देखील अर्थव्यवस्थेत सुधार पाहायला मिळाला आहे.

2) व्यापार युद्धावर तोडगा
मागील काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापार युद्धावर देखील तोडगा निघण्याची आशा असून पुढील वर्षीपर्यंत दोन्ही देशांमध्ये तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.

3) आशियामध्ये लवकरच बदल
आशिया खंडामध्ये व्यापार युद्धामुळे चीनचे सर्वात मोठे नुकसान होत असून या तोडग्यामुळे लवकरच चीनची अर्थव्यवस्था रुळावर येईल. त्याचबरोबर भारताची अर्थव्यवस्था देखील वर्षभरात सुधारणार असून ऑक्टोबरमध्ये यामध्ये थोड्या प्रमाणात सुधारणा पाहायला मिळाली आहे.

Visit : Policenama.com