मुस्लिमांवर हल्ले; राजद्रोहाची प्रकरणे… US च्या थिंक टँकने कमी केली भारताची फ्रिडम रँकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रिडम हाऊसने त्यांच्या सालाना रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, सद्या भारतात बहुपक्ष पद्धतीचे सरकार आहे, परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे सरकार भेदभावाचे धोरण राबवत आहेत. या दरम्यान हिंसेमध्ये वाढ झाली आहे आणि मुस्लिम संख्यांक याचा शिकार झाले आहेत.

अमेरिकेच्या वॉशिंग्टनस्थित थिंक टैन्कने भारताच्या फ्रिडम स्कोरला डाऊन म्हणजेच खाली केले आहे. फ्रीडम हाऊसच्या रँकिंगमध्ये भारत पहिला ‘free’ कॅटेगरी देशामध्ये होता. परंतू आता भारताच्या रँकिंगला घटवून ‘PARTLY FREE’ कैटेगरी मध्ये टाकले आहे.

या संस्थेने रिपोर्टमध्ये म्हंटले आहे की, जेव्हा भारतात २०१४ पासून नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आहे, तेव्हापासून भारतात नागरी स्वातंत्र्याचे हनन होत आहे. या रिपोर्टमध्ये राजद्रोहाच्या केसचा वापर मुस्लिम आणि लॉकडाऊनच्या दरम्यान लावलेल्या प्रतिबंधांशी संबंधित आहे.

या रिपोर्टमध्ये भारताचा स्कोर ७१ वरून कमी करून ६७ झाला आहे. येथे १०० स्कोर सगळ्यातून मुक्त देशांसाठी ठेवला गेला आहे. त्यात भारताची रँकिंग २११ देशांमध्ये ८३ वरून ८८ व्य स्थानावर आहे.

फ्रिडम हाऊसने त्यांच्या सालाना रिपोर्टमध्ये म्हंटले की, ”सद्या भारतात बहुपक्ष पद्धतीचे सरकार आहे, परंतु पंतप्रधान नरेंद मोदी आणि हिंदू राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टीचे सरकार भेदभावाचे धोरण अवलंबत आहे, यावेळेत हिंसा वाढली आहे आणि मुस्लिम समुदाय याचा शिकार झाले आहेत”.

रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे, या सरकारमध्ये मानवाधिकार संघटनेत दबाव वाढला आहे. लेखकांना आणि पत्रकारांना घाबरवले जात आहे. कट्टरपंथाद्वारे हमले केले जात आहेत. ज्यामध्ये लिंचिंगचा समावेश आहे आणि याचा निशाण मुस्लिम समुदाय बनत आहेत.

अहवालानुसार, स्वयंसेवी संस्था सरकारच्या अन्य समालोचकांना त्रास दिला जात आहे. मुस्लिम, अनुसूचित आणि अन्य जनजातीच्या लोकांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित झाले आहेत.

या अहवालामध्ये ६७ गुणांसह भारत इक्वेडोर आणि डोमिनिक रिपब्लिक यांच्या रांगेमध्ये आले आहे. फ्रिडम हाऊसने सांगितले, या गुणांचा अर्थ असा आहे की, जगातील २० % पेक्षा कमी लोकसंख्या ‘फ्री’ कन्ट्रीमध्ये राहतात, हा १९९५ नंतरचा सर्वात कमी आकडा आहे.

फ्रिडम हाऊसच्या अहवालानुसार १०० गुणांसह फिनलैंड, नार्वे आणि स्वीडन जगातील सर्वात स्वतंत्र देश आहेत. ज्यात १ गुणांसह तिबेट आणि सीरिया जगातील सर्वात कमी स्वतंत्र देश आहेत.

फ्रिडम हाऊसने त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हंटले, २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये रणनीती आणि निषेध प्रदर्शनाशी संबंधित हिंसेमध्ये ५० पेक्षा जादा लोक मारले गेले, ज्यामध्ये मुस्लिम संख्याक जास्त होते. अहवालात सांगितले आहे की, हे लोक सरकारच्या वतीने नागरिकत्व कायद्यात भेदभाव विरोधी प्रदर्शन करत आहेत.