‘या’ गोष्टीत भारत पाकिस्तानपेक्षा मागे, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताला 102 वे स्थान मिळाले आहे. या यादीत असलेल्या दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताला शेवटचे स्थान मिळाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या क्रमवारीत पाकिस्तानही भारताच्या पुढे आहे. पाकिस्तान यावर्षी 94 व्या स्थानावर आहे. 2015 मध्ये भारताची ग्लोबल हंगर इंडेक्स (जीएचआय) रँकिंग 93 होती.

त्यावर्षी दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान हा एकमेव देश होता जो या निर्देशांकात भारतापासून खाली होता. ग्लोबल हंगर इंडेक्स, 2014 ते 2018 या कालावधीत मिळवलेल्या आकडेवारीवर हा ग्लोबल हंगर इंडेक्स बनवण्यात आला आहे. विविध देशांमधील कुपोषित मुलांची लोकसंख्या, वजनाखालील किंवा त्यापेक्षा कमी वयाखालील मुलांची टक्केवारी आणि बालमृत्यू दर यावर आधारीत ही आकडेवारी आहे.

ब्रिक्स देशांमधील या देशातील सर्वात खराब कामगिरी –
भारताव्यतिरिक्त इतर आशियाई देश या क्रमवारीत 66 ते 94 या क्रमांकांदरम्यान आहेत. ब्रिक्स देशातील उर्वरित देशांपेक्षा भारत खूपच मागे आहे. (ब्रिक्स – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) त्याशिवाय ब्रिक्स देशांमध्ये दक्षिण आफ्रिका सर्वात वाईट कामगिरी करणारा देश आहे, त्याचा 59 वा क्रमांक आहे.

सन 2000 पासून नेपाळची प्रगती –
जीएचआयवर सादर केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की भारतात 6 ते 23 महिने वयोगटातील फक्त 9.6% मुले किमान अन्न मिळवू शकतात. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी केवळ 6.4% नोंदविण्यात आली आहे. अहवालानुसार 2000 पासून नेपाळमध्ये या आकडेवारीत सर्वाधिक सुधारणा झाली आहे.

भारतात भूक ही एक गंभीर समस्या
उपासमारीच्या स्थितीनुसार देशांना 0 ते 100 गुण दिले जातात आणि जीएचआय तयार केला जातो. यामध्ये 0 गुण हे सर्वोत्तम म्हणजे उपासमारीची स्थिती नाही. 10 पेक्षा कमी गुण मिळवण्याचा अर्थ असा आहे की देशात उपासमारीची फारच कमी समस्या आहे. त्याचप्रमाणे 20 ते 34.9 पॉईंट म्हणजे तीव्र उपासमार संकट, 35 ते 49.9 गुण म्हणजे स्थिती आव्हानात्मक आहे आणि 50 किंवा त्याहून अधिक पॉईंट म्हणजे उपासमारीची स्थिती अत्यंत भयावह आहे. भारताला 30.3 गुण मिळाले म्हणजे येथे उपासमारीची गंभीर समस्या आहे. आव्हानात्मक परिस्थिती प्रकारात केवळ चार देश आहेत तर मध्य आफ्रिकन रिपब्लिक अत्यंत भयावह प्रकारात आहे.

उपासमार वाढीची कारणे –
या अहवालात दिलेल्या इशाऱ्यानुसार, हवामान बदलांमुळे उपासमारीचे संकट उच्च पातळीवर पोहोचले आहे. जागतील अनेक भागांमध्ये उपासमारीचे प्रमाण वाढत आहे. तसंच अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेवरही विपरीत परिणाम होत आहे. तसंच शेती उत्पादनातील पोषक घटकांचं प्रमाणही कमी झालं आहे. या अहवालात असे म्हटले आहे की सन 2000 नंतर उपासमारीचे संकट कमी थोडे कमी झाले आहे, परंतु या समस्येवर पूर्णपणे मात करण्यासाठी आपल्याला अजून बरेच प्रयत्न करावे लागतील.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी