Global Mayors Challenge 2021 | जगभरातील 631 शहरातून पुण्याने गाठली अंतिम फेरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना (Corona) संकटाचा सामना करत असतानाही अभिनव संकल्पनांची (innovative concepts) अंमलबजावणी करणार्‍या शहरांसाठी घेतलेल्या ग्लोबल 2021 मेयर्स चॅलेंज सिटीज (Global Mayors Challenge 2021) या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुण्याचा (Pune) समावेश झाला आहे. पुणे शहरातर्फे सर्व इलेक्ट्रिक वाहनांचा (electric vehicles) भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाया ही योजना या स्पर्धेसाठी सादर केली होती. यातील हवामान आणि वातावरण या घटकांतर्गत पुण्याची निवड झाली आहे. जगभरातील 631 देशातून ही निवड झाली असून यात भारतातील केवळ 2 शहरांचा समावेश आहे. Pune becomes one of the 50 Global Mayors Challenge Champion cities

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजतर्फे 2021 ग्लोबल मेयर चॅलेंजचे आयोजन केले होते. यात जगातील 99 देशांतील 631 शहरांनी भाग घेतला होता. यात पहिल्या 50 शहरांत पुण्याचा समावेश आहे. स्पर्धेची अंतिम फेरी जून ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत होणार आहे. यात अंतिम 15 शहरांची निवड केली जाणार आहे. निवडलेल्या प्रत्येक शहराला त्यांच्या संकल्पनांची व्यापक अंमलबजावणी करण्यासाठी भरभक्कम तांत्रिक साहाय्य दिले जाणार आहे.

या स्पर्धेविषयी ब्लूम्बर्ग फिलाँथ्रॉपीजचे संस्थापक मायकेल ब्लूम्बर्ग म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करताना अनेक शहरे धाडसी, नावीन्यपूर्ण व महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यापुढील काही महिन्यांत या शहरांना त्यांच्या संकल्पनांची चाचणी करण्यास मदत केल्याने शहरे अधिक सामर्थ्यवान होतील. आत्यंतिक प्रगत धोरणे व कार्यक्रम स्वीकारून ते अंमलात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन लाभेल.

पुण्याच्या निवडीबद्दल महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.
इलेक्ट्रिक व्हेईकल याविषयीची पुण्याच्या प्रस्तावित कामासाठी अंतिम स्पर्धेसाठी निवड केल्याबद्दल ब्लूम्बर्गचे मनापासून आभार.
पुणे शहर हे देशातील वास्तव्यासाठीचे सर्वोत्तम शहरांपैकी एक आहे.
पुणे हे शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व वाहन उद्योगाचे केंद्र आहे.
परंतु शहराच्या विस्तारामुळे वाहन प्रदूषणात वाढ झाली आहे.
पर्यावरणस्थित वाहतूक व्यवस्थेसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्याचा आमचा संकल्प आहे.
शहरात विजेवर चालणार्‍या वाहनांच्या वापरासाठी योजना आखून त्याच्या अंमलबजावणीचे नियोजन आहे.
आम्ही राबवलेल्या संकल्पनेमुळे हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होईल आणि पुण्याच्या नागरिकांना उत्तम आरोग्यही लाभेल.

इलेक्ट्रिक वाहन निधी उभारून शहरात लवकरात लवकर इलेक्ट्रिक व्हेइकल्स सुरुवात. करण्याचा प्रस्ताव आम्ही ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉफीजकडे सादर केला आहे.
विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी कृतीयोग्य धोरणे आखणे व ही वाहने चालवण्यासंदर्भात मार्गदर्शनपर सूचनांचा आराखडा महापालिका तयार करेल.
यासाठीचा इव्ही निधी हा वाहनांकरिता प्रोत्साहनपर आर्थिक सवलती, चार्जिंग स्टेशन्स, इतर संभाव्य संबंधित घटक अशा सर्व गोष्टींचा एकत्रित आराखडा तयार करण्याकरिता वापरला जाईल.
विजेवर चालणार्‍या वाहनांचा वापर सुरू करण्याकरिता पुणे महापालिका ब्लूमबर्ग निधीचा विनियोग सिटी इव्ही रेडिनेस प्लॅन तयार करणे, सिटी इव्ही निधी उभारण्यासाठी करणार आहे.

Wab Title :- Global Mayors Challenge 2021 | Pune becomes one of the 50 Global Mayors Challenge Champion cities

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

MP Chhatrapati Sambhaji Raje । संभाजीराजेंचा चंद्रकांत पाटलांवर पलटवार; म्हणाले – ‘खासदारकी मागायला मी भाजपाकडे गेलो नव्हतो’

Vaccination Scam | मुंबईतील हाऊसिंग सोसायटीत बोगस लसीकरण; 390 जणांकडून घेतले प्रत्येकी 1260 रुपये