सुशांत सिंह राजपुतसाठी 15 ऑगस्टला होणार ‘ग्लोबल’ प्रेयर, बहीण श्वेतानं केलं सहभागी होण्याचे ‘आवाहन’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय मिळवून देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. गुरुवारी सुशांतची बहीण श्वेता आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करत न्याय मागितला. आता 15 ऑगस्टला होणाऱ्या ग्लोबल प्रेयर मध्ये लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सुशांतची बहीण श्वेताने केले आहे.

सुशांतला न्याय मिळवून देणारी खास मोहीम

श्वेताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे- मी आपणा सर्वांना आवाहन करते कि सुशांतसाठी ठेवण्यात आलेली 24 तासांची ग्लोबल स्पिरिच्युअल आणि प्रेयर ऑब्जर्वेशन मध्ये सामील व्हा. जेणेकरून आम्हाला सत्य समोर आणता येईल आणि सुशांतला न्याय मिळेल. #GlobalPrayersSSR
#CBIForSSR #Warriors4SSR
#justiceforSushantSinghRajput
#Godiswithu

या पोस्टसोबत सुशांतच्या बहिणीने एक पोस्टरही शेअर केला आहे. ही ग्लोबल प्रेयर 15 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होईल. या ठिकाणी सुशांतसाठी सर्वजण मिळून मौन पाळतील आणि प्रार्थना करतील. याआधी श्वेताने एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची हात जोडून विनंती केली होती. पोस्ट शेअर करत किर्तीने लिहिलं होतं – हीच वेळ आहे सत्याला शोधण्याची, ज्यामुळे आम्हाला न्याय मिळेल. कृपया सत्य समोर आणण्यासाठी आमची आणि संपूर्ण जगाची मदत करा. सुशांत केसच्या सीबीआय चौकशीसाठी आवाज उठवा आणि सांगा कि सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी त्याचे कुटुंबीय रिया चक्रवर्तीला जिम्मेदार ठरवत आहेत.

सुशांतच्या वडिलांनी पटनाच्या राजीव नगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. रियाने सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले असा त्यांचा आरोप आहे. तसेच रियाने सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप के के सिंह यांनी केला आहे. सुशांतसिंह प्रकरणाची सीबीआय आणि ईडी कडून चौकशी सुरु आहे.