‘कोरोना’ व्हायरसनं घेतले महामारीचं रूप तर जगात आर्थिक ‘मंदी’ येणार : मूडीज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत अजूनही कायम आहे. जर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असाच राहिला तर जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या चपाट्यात अडकू शकते. मूडीज अ‍ॅनालिटिक्स मुख्य अर्थशास्त्रज्ञ मार्क झांडी यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार आता इटली आणि कोरियामध्येही झाला आहे. अशा परिस्थितीत हा रोग महामारीचे रूप घेण्याची शक्यता वाढली आहे. ते म्हणाले की, कोरोना विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून आता याचा फटका संपूर्ण जगाला बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोना विषाणूचे अधिकृत नाव कोविड -१९ आहे. ज्याची सुरुवात चीनच्या वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये झाली.

कोरोना विषाणूचा जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होतोय परिणाम :
मूडीज अ‍ॅनालिटिक्सने सांगितले कि, कोविड -१९ जागतिक अर्थव्यवस्थेला अनेक प्रकारे झटके देत आहे. चीनमध्ये व्यापाराच्या दृष्टीने प्रवास आणि पर्यटन पूर्णपणे ठप्प झाला आहे. जगातील एअरलाईन कंपन्यांनी चीनकडे जाणारी उड्डाणे थांबविली आहेत. अमेरिकेसारख्या प्रमुख प्रवासासाठीही ही समस्या उद्भवली आहे. दरवर्षी चीनमधील 3 दशलक्ष पर्यटक अमेरिकेत येतात. विदेशी पर्यटकांनी अमेरिकेत खर्च करण्यात चिनी पर्यटक आघाडीवर आहेत. युरोपमधील प्रवासावरही याचा परिणाम होत आहे.

मूडीज अ‍ॅनालिटिक्सने सांगितले कि, बंद कारखाने ही चीन आणि चीनमधील उत्पादन पुरवठा साखळीवर अवलंबून असलेल्या कंपन्यांसाठी समस्या आहे. अ‍ॅपल, नाईक आणि जनरल मोटर्स अश्या अमेरिकन कंपन्या आहेत, ज्या यामुळे प्रभावित आहेत. मार्क यांनी सांगितले कि, चीनमध्ये मागणी कमी झाल्याने अमेरिकेच्या निर्यातीवरही परिणाम होईल. गेल्या वर्षी, दोन्ही देशांमधील पहिल्या टप्प्यातील कराराअंतर्गत चीनला अमेरिकेतून आयात वाढवायची होती. ते म्हणाले की, चीन अमेरिकेतून प्रत्यक्षात किती आयात करत असा सवाल होता, मात्र कोविड -१९ नंतर अधिक शंका निर्माण झाली आहे.

You might also like