Global Risks Report : ‘कोरोना’च्या नंतर येणार आहे आणखी एक महासंकट, ‘या’ मोठ्या धोक्याचे सावट

नवी दिल्ली : अद्याप जगावरील कोरोना व्हायरसचा कहर अजून पूर्णपणे संपलेला नसतानाच जागतिक स्तरावर आणखी एका संकटाचे सावट दिसू लागले आहे. या वर्षीचा ग्लोबल रिस्क रिपोर्ट (Global Risks Report) आता जारी करण्यात आला आहे. ग्लोबल रिस्क रिपोर्टच्या ताज्या आवृत्तीत जगावर असलेल्या धोक्याच्या सावटाबाबत इशारा देण्यात आला आहे. ग्लोबल रिस्क रिपोर्टनुसार, एक धोक्याचे सावट असून तो कोरोना महामारीपेक्षा मोठा आहे.

हा आहे मोठा धोका
ग्लोबल रिस्क रिपोर्टनुसार, पुढील 5-10 वर्षात भौगोलिक राजकीय स्थिरता गंभीर प्रकारे कमजोर होईल. जर ग्लोबल रिस्क रिपोर्टची भविष्यवाणी खरी ठरली, तर जगाचे अरबो रूपयांचे नुकसान होईल आणि याचा अर्थ असा होईल की, पुन्हा एकदा जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात येईल. आगामी काळात जागतिक महामारी, आर्थिक मंदी, राजकीय उलथा-पालथ आणि सातत्याने बिघडत चाललेले जलवायु संकट जगासाठी एक मोठे संकट बनू शकते.

या कारणामुळे होईल जगात उलथा-पालथ
2020 मध्ये कोविड-19 सर्वात मोठे संकट होते, ज्याचा संपूर्ण जगाने सामना केला, परंतु याचा अर्थ असा नाही की, जलवायुशी संबंधित प्रकरणे कमी धोकादायक आहेत. जलवायु संकटाशी संबंधीत प्रकरणांना मानवतेसाठी संभाव्य धोका मानला जात आहे, या कारणामुळे तो जास्त संवेदनशील आहे. लॉकडाऊन आणि अंतरराष्ट्रीय व्यापार आणि प्रवासावर बंदीमुळे कार्बन उत्सर्जनात घसरण होऊनही जलवायु संकट एक चिंताजनक मुद्दा आहे.

असा तयार होतो रिपोर्ट
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जसे कोरोनानंतर जनजीवन रूळावर परतणार आहे, अर्थव्यवस्था ठीक होण्यास सुरूवात होईल, तेव्हा उत्सर्जन वाढू लागेल आणि पुन्हा जलवायुचे संकट गडद होईल. 2021 चा ग्लोबल रिस्क रिपोर्ट अनेक गटांच्या 650 पेक्षा जास्त सदस्यांनी मोठ्या मेहनतीनंतर तयार केला आहे. यासाठी जगभरातून डेटा जमवण्यात आला आहे. जलवायु संकटाशिवाय, संसर्गजन्य रोग, जंगलातील आग या सर्व मोठ्या धोक्यांचे जगावर सावट आहे.

कोरोनाने बिघडवली सर्व देशांची स्थिती
मागच्या वर्षी 2020 मध्ये जेव्हा ग्लोबल रिस्क रिपोर्ट आला होता तेव्हा संसर्गजन्य आजरांचा धोका 10 व्या नंबरवर होता. डब्ल्यूईएफने 25 जानेवारीपासून 29 जानेवारीच्या दरम्यान आयोजित होत असलेल्या व्हर्च्युअल दावोस एजेंडा शिखर संमेलनापूर्वी हा रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, जगाला 2020 मध्ये महामारीमुळे होऊ शकणारा विध्वंस पाहिल्यानंतर दीर्घकालिन जोखमीसाठी तयार होण्याची गरज आहे. हा जागतिक जोखीम रिपोर्ट मागील 12 वर्षापासून जगाला महामारीबाबत सावध करत होता.