Coronavirus Impact : पहिल्यांदाच स्मार्टफोन विक्रीत 38 % ‘घट’, भारतात Phone झाले ‘महाग’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरस- कोविड -19 मुळे बर्‍याच उद्योगांवर परिणाम झाला असला तरी स्मार्टफोन बाजाराला मोठा धक्का बसला आहे. अहवालानुसार, कोरोना व्हायरसमुळे स्मार्टफोन उद्योगात इतिहासात प्रथमच मोठी घसरण पहायला मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जागतिक स्मार्टफोन शिपमेंटमध्ये फेब्रुवारी महिन्यात वर्षाच्या तुलनेत 38% घट नोंदली गेली आहे. आत्तापर्यंत स्मार्टफोन शिपमेंटमध्ये कधीही 38% घट झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जगभरात 99.2 मिलियन स्मार्टफोन विकले गेले होते, परंतु 2020 मध्ये म्हणजे यावर्षी ही विक्री केवळ 61.8 मिलियन युनिट्सवर गेली.

अहवालानुसार, गेल्या महिन्यात कोविड -19 च्या उद्रेकामुळे आशियातील स्मार्टफोनची मागणी कमी झाली होती, परंतु हळूहळू त्याचा परिणाम जगभरात झाला आणि आता जागतिक मागणी कमी झाली आहे.

असे सांगितले जात आहे की, काही आशियाई कारखान्यांमध्ये स्मार्टफोनचे उत्पादन तयार होत नाहीत, तर जास्तप्रमाणात ग्राहकांना स्मार्टफोन विकत घेण्यासाठी किरकोळ स्टोअरमध्ये जाण्याची इच्छा नाही. यामुळे स्मार्टफोनची मागणी घटण्याची नोंद होत आहे.

Apple ने नुकतेच असेही म्हटले आहे की, बर्‍याच देशांमध्ये आता कंपनी एकावेळी एका मॉडेलचे फक्त दोन आयफोनची विक्री करेल. इतकेच नाही तर चीनमधील Apple ची सर्व स्टोअर अजूनही बंद आहेत आणि ती पुन्हा कधी उघडणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

भारतात स्मार्टफोन कंपन्यांसाठी एक मोठी बाजारपेठ आहे आणि त्याचा येथे अधिक परिणाम होऊ शकतो. हा फोनही महाग असण्याची अपेक्षा आहे. कोरोना व्हायरस आणि मोबाईलवर जीएसटी वाढल्यामुळे भारतात आगामी काळात कंपन्या आपल्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवू शकतात.