‘ही’ मॉडेल आज ‘ग्लोबल’ स्टार, एकेकाळी चेहर्‍यावरून उडवली जायची ‘थट्टा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईत शनिवारी रात्री ‘Vogue Women Year’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक स्टार्सने हजेरी लावली होती. यातील एका मॉडेलने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कॅनडाची ही मॉडेल आहे विनी हार्लो. गोल्डन कलरच्या स्किनफिट आऊटमधील विनीने रेड कार्पेटवर स्टायलिश अंदाजात पोज दिल्या. सध्या विनीचे हे फोटो सोशलवर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत.

कोण आहे विनी हार्लो?
विनी हार्लो हॉलिवूडच्या प्रसिद्ध मॉडेलपैकी एक आहे. कॅनडाच्या या मॉडेलला ‘अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ या रिअ‍ॅलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली होती. या शोमध्ये येणारी ती एकमेकव कॅनेडियन मॉडेल होती. दुसऱ्या आठवड्यातच विनी एलिमिनेट झाली होती. 2018 मध्ये तिचं व्हिक्टोरिया सिक्रेट मध्ये रॅम्प वॉक करण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. या मोठ्या इव्हेंटमध्ये तिने चार चांद लावले होते. विनीने अनेक फेमस हॉलिवूड सेलेब्रिटींसोबत काम केलं आहे. किम कार्दशियनसोबतही तिने मेकअप लाईनमध्ये अनेक शुट्स केले आहेत.

चेहऱ्यामुळं उडवली जायची खिल्ली
विनीला लहानपणापासूनच Vitiligo (कोड फुटणे) नावाचा त्वचेचा आजार आहे. त्यामुळे तिच्या स्किनवर मोठे पांढरे डाग आहेत. तिने यावर अनेकदा खुलून भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत विनीने सांगितले की, लहानपणी तिला मुलं गाय म्हणून चिडवत असतं. तिला मैत्री करायची होती परंतु सर्व तिची खिल्ली उडवायचे.

विनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर विनीने बियोंसे, सिया आणि एमिनेम यांसारख्या टॉप सिंगर्सच्या म्युझिक व्हिडीओत काम केलं आहे. याशिवाय ती लिली सिंहच्या युट्युब व्हिडीओतही दिसली आहे. मॉडेलिंगच्या दुनियेतील अनेक मोठे अवॉर्ड विनीने जिंकले आहे.

View this post on Instagram

💫💫💫

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

View this post on Instagram

Omg a DREAM 💫

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

View this post on Instagram

KKW X WINNIE KKWBEAUTY.COM Out Now!

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

View this post on Instagram

Bae watch 👀💙 @thesetaimiamibeach

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

View this post on Instagram

Wear your sunscreen kids 🧴🌤

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

View this post on Instagram

Meet me on the beach? 🏖🍹

A post shared by ♔Jamaican Canadian♔ (@winnieharlow) on

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like