चीनचं भ्रमजाल, म्हणतोय – ‘Boycoot China फ्लॉप, खूपच आयात करतोय भारत !’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा नारा दिला आहे. पीएम मोदी यांचे म्हणणे आहे की, देशातील 130 कोटी लोकांचे समर्थन आणि सहकार्यातून भारताला आत्मनिर्भर बनवता येईल. उद्योग जगतापासून सामान्य माणसापर्यंत देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपले सहकार्य देत आहेत.

जर भारत आत्मनिर्भर झाला तर आयात कमी होईल, परंतु काही देशांच्या हे पचनी पडताना दिसत नाही की, भारत आता आयात नाही तर निर्यातीवर फोकस करत आहे. गलवान खोर्‍यातील हिंसेनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे आणि या तणावामुळे दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम झाला आहे.

सीमेवरील चीनच्या कुरापतींमुळे देशात चायनीज प्रॉडक्ट्सचा बहिष्कार केला जात आहे. लोक मेड इन इंडिया प्रॉडक्ट खरेदी करत आहेत, ज्यामुळे चीनची आगपाखड होत आहे आणि तो दावा करत आहे की, भारताची आयात घटली नाही तर वाढली आहे.

चीनचा सरकारी मीडिया ग्लोबल टाइम्सनुसार भारतात जो चीनी वस्तूंवर बहिष्कार सुरू आहे, त्यामुळे त्यांच्या व्यापारावर कोणताही परिणाम झालेला नाही. भारतात मोठा विरोध होऊनही मागच्या महिन्यात आयात वाढली आहे. परंतु, यासाठी चीनने जो डाटा सार्वजनिक केला आहे, तो भारताच्या डाटाशी मॅच होत नाही.

चीनी मीडियाचे म्हणणे आहे की, कोराना काळातसुद्धा आयात घसरणे दूरच, उलट त्यामध्ये वाढ झाली आहे. चीनी कस्टम डाटानुसार भारताची चीनमूधन एप्रिलमध्ये आयात 3.22 अरब डॉलर होती, जी मे मध्ये वाढून 3.25 अरब डॉलर झाली, त्यानंतर जूनमध्ये 4.78 अरब डॉलर होती, आणि नंतर जुलै महिन्यात आयात वाढून 5.6 अरब डॉलर झाली.

परंतु, हा चीनी मीडियाचा दावा आहे, कारण हे आकडे भारताच्या आयात आकड्यांशी जुळत नाहीत. भारताच्या कॉमर्स मिनिस्ट्रीनुसार एप्रिलमध्ये चीनकडून आयात 3.03 अरब डॉलर, मे मध्ये 4.66 अरब डॉलर आणि जूनमध्ये 3.32 अरब डॉलरची होती. तर जुलैचा आकडा अजून जारी झालेला नाही. चीन जूनमध्ये 4.78 अरब डॉलरचा दावा करत आहे, पण प्रत्यक्षात आकडा 3.32 अरब डॉलरचा आहे.

तर चीन सरकारकडून कस्टमच्या आधारावर दिलेला आणखी एक डाटा पाहिला तर हे स्पष्ट होते की, भारताचा चीनकडील व्यापार कमी झाला आहे. जानेवारीपासून जुलै – 2020 पर्यंत भारतात चीनची निर्यात 24.7 टक्के वार्षिक दराने घसरून 32.28 बिलियन डॉलर झाली आहे. मात्र, चीनच्या निर्यातीत जून-2020 च्या 4.79 बिलियन डॉलरच्या तुलनेत जुलै, 2020 मध्ये 5.6 बिलियन डॉलरची किरकोळ वाढ दिसून येत आहे.

एकुण पाहिले तर जानेवारी 2020 पासून जुलैपर्यंत भारताचा चीनसोबत व्यापारात 43.47 बिलियन डॉलर झाला आहे. ज्यामध्ये मागील वर्षीच्या समान कालावधीची तुलना केल्यास 18.6 टक्के घसरण नोंदली गेली आहे.