गौरवास्पद ! पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह महाराष्ट्रातील 57 जणांना ‘राष्ट्रपती पोलिस पदक’

पोलीसनामा ऑनलाइन – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पोलिस शौर्य पदक, राष्ट्रपती विशेष सेवा पदक व गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पोलिस पदक जाहीर करण्यात आले आहेत. यात राज्यातील एकूण 57 जणांना हे पदक मिळाले आहेत. त्यात पुणे शहरातील 2 पोलिस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय व प्रशंसनीय कार्यासाठी पदक जाहिर झाले आहे. पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजानन पवार अशी त्यांची नावे आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने पोलिस दलातील अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामासाठी वेगवेगळ्या पदकाने गौरविले जाते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना प्रेसिडेंट मेडल तर सह पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांना पोलीस मेडल मिळाले आहे.

Police Medal For Gallantry (पोलीस शौर्य पदक- PMG)

पोलीस उपअधिक्षक आर. राजा

पोलीस उपअधिक्षक एन. हरीबालाजी

पोलीस निरीक्षक गजानन दत्तात्रय पवार

उपनिरीक्षक नागनाथ पाटील

पोलीस कर्मचारी महादेव मारोती माधवी

कमलेश अशोक आरका

हेमंत कोरके माधवी

अमोल श्रीराम जगताप

वेल्ला कोरके आत्राम

सुधाकर मोगलीवार

बिऐश्वर विष्णू गेडाम

गिरीश ढेकले

निलेश धुमने

 

President Police Medal For Distinguished Service (प्रशंसनीय सेवेसाठी पोलिस पदक)

प्रभात कुमार (Addl. DG एसीबी मुंबई),

डॉ. सुखविंदर सिंग (एसआरपीएफ, मुंबई, Addl. DG),

निवृत्ती तुकाराम कदम (एसीपी ठाणे पोलीस),

पोलीस निरीक्षक विलास गंगावणे (मुंबई पोलीस)

Police Medal for Meritorious Service (उल्लेखनीय सेवेसाठी पोलिस पदक)

डॉ. रवींद्र शिसवे (पोलिस सह आयुक्त, पुणे), प्रविणकुमार पाटील (पोलिस उपायुक्त, नवी मुंबई), वसंत जाधव (पोलिस उपायुक्त, भंडारा), कल्पना गाडेकर (अँटी टेररिस्ट स्कॉड, सायबर सेल, नवी मुंबई), संगिता शिंदे-अल्फोन्सो (पोलिस उपायुक्त, जात पडताळणी समिती), दिनकर मोहिते (पोलिस निरीक्षक, सिबिडी, बेलापूर), मेघ:श्याम डांगे (पोलिस निरीक्षक, अक्कलकुवा, नंदुरबार), मिलिंद देसाई (पोलिस निरीक्षक, शेड्युल ट्राईब छानणी समिती), विजय डोळस (पोलिस निरीक्षक, निजामपुरा पोलिस स्टेशन), रविंद्र दौंडकर (पोलिस निरीक्षक, वाशी), तानाजी सावंत (पोलिस निरीक्षक, कोल्हापूर), मनीष ठाकरे (पोलिस निरीक्षक, अमरावती शहर), राजू बिडकर (पोलिस निरीक्षक, डि.बी मार्ग पोलिस स्टेशन, मुंबई), अजय जोशी (पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा, अंधेरी, मुंबई), प्रमोद सावंत (पोलिस निरीक्षक, टेक्नॉलॉजी सेल, मुंबई), भगवान धबडगे (पोलिस निरीक्षक, देगलुर, नांदेड), रमेश कदम (पोलिस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, ठाणे), राजेश नागरुरकर (राखीव पोलिस दल, मुख्यालय, बुलडाणा), सूर्यकांत बोलाडे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, रेल्वे पोलिस घाटकोपर), लीलेश्वर वारहडमरे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, चंद्रपूर), भारत नाले (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा), हेमंत पाटील (सहायक उपनिरीक्षक, रायगड), अशोक मागलेकर (सहाय्यक उपनिरीक्षक, अमरावती), जीवन जाधव (सहाय्यक उपनिरीक्षक, मुंबई), राजेंद्र मांडे (सहाय्यक उपनिरीक्षक, रायगड), विजय बोरीकर (सहाय्यक उपनिरीक्षक, चंद्रपूर), पुरुषोत्तम बरद (सहाय्यक उपनिरीक्षक, अमरावती), उद्यामकुमार पालांडे (ठाणे), थॉमस डिसोझा (सहायक उपनिरीक्षक, ठाणे), प्रकाश चौगुले (सहाय्यक उपनिरीक्षक, रेल्वे, मुंबई), सुरेश मोरे (सहाय्यक उपनिरीक्षक, ठाणे), संजय साठम (सिंधुदुर्ग), शकिर जीनेडी (पिंपरी चिंचवड), संजय पवार (नवी मुंबई), शरडप्रसाद मिश्रा (नागपूर), प्रकाश अंदिल (जालना), जयराम धनवाई (एसटीडी, औरंगाबाद), राजू उसेंडी (एसआयडी, उरोंची)