लोणी काळभोर येथील जी.एम. ग्रुपच्या मूर्तीदान उपक्रमास उदंड प्रतिसाद

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन  – येथील जी. एम. ग्रुपच्या माध्यमातून गणेश विसर्जनाच्या मूर्तीदान हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला यातून पर्यावरणाची होणारी हानी तर वाचणार आहेच परंतु यातून सर्वसामान्यांना एक संदेश जाणार आहे.

आज अनंत चतुर्थशी असल्याने दहा दिवसाचा पाहुणचार घेऊन आपले बाप्पा निरोप घेतात. अतिशय जिव्हाळ्याचा व भावनिक प्रसंग असतो. परंतु बाप्पाचे विसर्जन नदीत केल्याने पर्यावरणाचे अतोणात नुकसान होते. यावर आपण मूर्तीदान करुन पर्यावरण वाचवण्याचे महान काम करु या असा संदेश माळीमळा परिसरातील जी. एम. ग्रुपने दिला.यासाठी मुळा मुठा नदीच्या काठावर एक स्वागत कक्ष उभारून आलेल्या बाप्पाचे आदराने स्वागत केले. या उपक्रमास लोणीकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. एम आय. टी. शेजारी हा स्वागत कक्ष आहे. येथे घरगुती गणपतीसह मोठमोठ्या तरुण मंडळानीही यास प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमात मागील वर्षी 800 च्यावर मूर्ती जमा झाल्या होत्या. यावर्षीचा प्रतिसाद पाहता 1000 च्यावर मूर्ती गोळा होतील असे जी. एम. ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले आहे. येथे जमा होणार्या सर्व मूर्ती कुंभार समाजास मोफत देण्यात येणार असल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले.

या ग्रुपच्या माध्यमातून अनेकविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात.यामध्ये बेटी बचाव बेटी पढाव, पुरग्रस्तांना वस्तुंचे वाटप, रक्तदान, झाडेलावा झाडे जगवा, वारकरी सेवा, एक कन्या दांपत्याचा सत्कार, पाणी आडवा पाणी जिरवा याचा समावेश आहे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like