‘WhatApp’च्या आधी ‘Gmail’ यूजर्सला मिळालं ‘हे’ खास फिचर, होणार फायदा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जीमेल यूजर्सला एका असे फीचर अपडेट मिळाले आहे ज्याची अनेक यूजर्स वाट पाहत होते. कंपनीे ios आणि अ‍ॅण्ड्राइड यूजर्ससाठी ‘डार्क मोड फीचर’ रोल आऊट केले आहे.

फक्त या यूजर्सला मिळेल डार्क मोड
ios 13 आणि ios 10 वर चालू असलेल्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही बदल न करता जीमेलचा डार्क मोड वापरता येणार आहे. गुगलने सांगितले की डार्क मोड यात आपोआप अ‍ॅडजेस्ट होईल. गुगल फोनमध्ये जर तुम्ही बॅटरी सेवर पर्याय वापरत असाल तर जीमेल स्वत:च डार्कमोड अ‍ॅडजेस्ट करेल.

डार्क मोडचे फायदे
जीमेल बॅकग्राऊंडला डार्कमोडमध्ये बदलेल. ज्यात इनबॉक्ससह ईमेल्सचा समावेश असेल. यामुळे यूजर्सला डोळ्याला त्रास होणार नाही. तसेच यामुळे फोनची बॅटरी देखील लवकर कमी होणार नाही.

गुगल पे ने देखील दिला डार्क मोड
गुगल पे ला देखील हे फीचर मिळाले. हे फीचर सर्व अ‍ॅण्ड्राइड मोडवर मिळेल. जेव्हा तुम्ही अ‍ॅपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट कराल आणि जेव्हा तुमचा मोबाइल सेविंग मोडवर असेल तर तुमचा डार्क मोड आपोआप स्विच होईल.

Whatsapp यूजरला पाहावी लागणार वाट
जीमेल यूजर्सला whatapp आधीच ही डार्कमोडची सुविधा मिळाली. ज्याची अनेक यूजर्स वाट पाहत होते. जीमेलने दोन्ही म्हणजे ios आणि अ‍ॅण्ड्राइड यूजर्ससाठी हे फीचर आणले आहे.