तुमचे Gmail अकाऊंट आणखी कुणी वापरत आहे का? हे जाणून घेण्याची ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – (Gmail) सामान्यपणे गुगल अकाऊंटवरून (Google Account) अनेक इतर अकाऊंट लिंक्ड केलेली असतात. इतके सर्व पासवर्ड जीमेल अकाऊंटसोबत तुम्ही लिंक करून ठेवता. अशावेळी जर तुमचे जीमेल अकाऊंट (Gmail) हॅक झाले तर मोठ्या अडचणीत सापडू शकता.
तुमच्या जीमेल आयडीवरून अनेक अकाऊंट हॅक होऊ शकतात. यासाठी जीमेल अकाऊंटची सिक्युरिटी आणि अव्हेयरनेस तुमच्यासाठी खुप महत्वाचे आहे.
अनेकदा असे होते की, तुमचे Gmail इतर कुणीतरी अॅक्सेस करत असते आणि तुम्हाला याबाबत काहीही माहित नसते. यासाठी तुम्ही सोपे उपाय वापरू शकता.
जीमेल अॅक्सेस तुम्ही कोण-कोणत्या डिव्हाईसवरून करता?
सर्वप्रथम आपल्या गुगल अकाऊंटमध्ये जाऊन हे पहा की तुम्ही आतापर्यंत किती डिव्हाईसवरून जीमेल अॅक्सेस केले आहे. आपल्या गुगल अकाऊंटमध्ये जाऊन नेव्हिगेशन पॅनलवरून Security पॅनलमध्ये जा.
Security पॅनलमध्ये Manage Devices चा ऑपशन असेल. येथे क्लिक करताच तुम्हाला दिसेल की, सध्या किती डिव्हाईसवरून एकाचवेळी लॉग्ड इन आहात. जास्त डिटेल्ससाठी लिस्टमधील डिव्हाईस सिलेक्ट करा.
जर या लिस्टमध्ये तुम्हाला असा एखादा डिव्हाईस दिसत असेल ज्याद्वारे तुम्ही लॉगइन केलेले नाही तर समजा की तुमचे अकाऊंट कुणीतरी अॅक्सेस करत आहे. पण चांगली बाब म्हणजे, येथून तुम्ही तो डिव्हाईस साईन आऊट करून हटवू शकता.
तुमचे जीमेल अकाऊंट कुठून लॉगइन केले जात आहे हे पाहण्याची आणखी एक दुसरी पद्धत आहे. जर कम्प्युटरवरून तुम्ही जीमेल लॉगइन केलेले असेल तर जीमेल फ्रंट पेज स्क्रोल करून तळापर्यंत जा.
लास्ट अॅक्टिव्हिटी तुमच्यासाठी इम्पॉर्टेट टूल
खाली उजव्या बाजूला Last account activity XX Minutes ago दिसेल. याच्या अगदी खाली Details वर क्लिक करा.
क्लिक करताच एक नवीन विंडो ओपन होईल. येथे तुमच्या अकाऊंटची अॅक्टिव्हिटी लिस्ट आहे.
सर्वात वर current Session Information दिसेल. येथे ब्राऊजरचे नाव आणि लोकेशन आयपी अड्रेस पाहू शकता.
याच्या अगदी खाली एक टेबल मिळेल जिथे आयपी, लोकेशन आणि लॉगइन डेट आणि टाइम असेल.
आता तुम्ही हे लक्षपूर्वक पहा आणि मॅच करा. जर तुम्हाला वाटत असेल की असे लॉगइन सेशन दिसत आहे
जे तुम्ही केलेले नाही तर समजून जा की इतर कुणीतरी जीमेल अकाऊंट अॅक्सेस केले आहे.
येथून तुम्ही साईन आऊट सुद्धा करू शकता. याशिवाय आयपीच्या आधारे सुद्धा शोध घेऊ शकता
की कोणत्या लोकेशनवरून अॅक्सेस केले गेले होते.
लक्षात ठेव, हॅकर्स आयपी बाऊन्स करण्यासाठी वेगवेगळे टूल्स सुद्धा वापरतात, यासाठी आयपीवरून योग्य लोकेशनचा शोध लागेलच असे नाही.
तसेच, तुम्ही जीमेलच्याच्या Security Check Up ऑपशनवर टॅप करून आणखीही माहिती मिळवू शकता आणि आपले अकाऊंट सिक्युअर करू शकता.
Web Title :- Gmail | gmail account hacked how to know who is accessing your account
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | दुर्दैवी ! कॉलेजमधून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला वाहनाची धडक, दोघांचा मृत्यू