Gmail Password | तुम्हाला सुद्धा बदलता येत नसेल ‘जीमेल’चा पासवर्ड तर जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Google ची मेल (gmail password) सर्व्हिस म्हणजेच जीमेलचा वापर आपण दिवसभरात अनेकदा करतो. ऑफिसच्या कामात सुद्धा याचा वापर होतो. अनेकदा असे होते की, आपल्याला नाईलाजाने पासवर्ड बदलावा लागतो. आपला मेल आयडी (gmail password) सिक्युअर ठेवायचा असेल तर काही महिन्यांच्या अंतराने त्याचा पासवर्ड बदलत राहिले पाहिजे.
आता प्रश्न हा आहे की, हा पासवर्ड कसा बदलायचा. जर तुम्हाला जीमेलमध्ये पासवर्ड बदलता येत नसेल तर आम्ही तुम्हाला आज पासवर्ड बदलण्याची पद्धत सांगणार आहोत. जीमेलमध्ये पासवर्ड कसा बदलायचा जाणून घेवूयात…
जीमेलमध्ये असा बदला पासवर्ड
* सर्वप्रथम Gmail ओपन करा आणि Settings मध्ये जा.* Settings मध्ये जाऊन आता आपल्या ईमेल आयडीवर क्लिक करा.* आता येथे Manage your Google Account वर क्लिक करा.* इतके केल्यानंतर टॉपवर Security सेक्शनमध्ये जा.* येथे Signing in to Google ऑपशनमध्ये जा आणि Password वर क्लिक करा.* येथून तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये साइन इन करण्यास सांगितले जाईल.* साइन इन केल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड टाकावा लागेल.* आता तुम्ही Change Password वर क्लिक करून पासवर्ड बदलू शकता.
धक्कादायक ! भाजप नेत्याचे मॉडेलसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, प्रचंड खळबळ