नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुगलची ईमेल सर्विसचा वापर जगभरातील 1.5 बिलियन लोक वापर करतात, तसे पाहिले तर गुगल ईमेल सर्विस सुरक्षित आहेच परंतू यूजर्सची संस्खा आधिक असल्याने ती शक्यता आधिक आहे. पण तरीही तुमचे अकाऊंट हॅक झाले तरी देखील तुम्ही तुमचा डेटा रिकवर करु शकतात. जीमेल अकाऊंट जर हँक झाले असेल तर सावध राहा आणि अकाऊंट हॅक झाल्यास असा करा तुमचा डेटा रिकवर.
असा करा रिकवर डाटा –
1. जर अकाऊंट हॅक झाले तर सर्वात आधी अकाऊंट रिकवरी पेजवर जावे.
2. आपला ID आणि जुना पासवर्ड आठवत असेल तर तो फिल करा.
3. जर तुम्हाला पासवर्ड लक्षात नसेल तर तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील, ज्याची उत्तरे दिल्यावर तुम्हाला अकाऊंट पुन्हा एकदा वापरता येईल.
4. विचारण्यात आलेले प्रश्न, सिक्योरिटी प्रश्न असतील, त्याची उत्तरे तुम्ही अकाऊंट सेट करताना तुम्ही दिेलेली असतील.
5. रिकवरीसाठी तुम्ही रिकवरी ईमेल आणि मोबाईल नंबरचा वापर करु शकतात.
6. Gmail तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर आणि रिकवरी ईमेल आयडी वर कोड पाठवेल.
7. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला आपला पासवर्ड बदलण्यासाठी सांगण्यात येईल.
8. sign in केल्यानंतर आपली सिक्युरेटी चेक करुन घ्या आणि तुमची सिक्युरेटी इन्फॉर्मेशन बदला.
देशात मुलींची संख्या घटली, अखेर मानवी हक्क आयोगाकडून दखल
गरोदरपणातच स्ट्रेच मार्क्स होतात, हे चूकीचे ; जाणून घ्या सत्य
रक्तसंकलन करून तेरणा समूहाच्या कर्मचाऱ्यांनी जपले समाजभान
शेविंग क्रीमला घरातच उपलब्ध आहेत ‘हे’ पर्याय