GMC Solapur Recruitment 2021 | सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती; थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – GMC Solapur Recruitment 2021 | सोलापुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (Dr. Vaishampayan Smriti Government Medical College Solapur) लवकरच काही जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC Solapur Recruitment 2021) नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. या भरतीबाबत अधिसुचना (Notification) जारी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (Interview) उपस्थित राहायचं आहे.

पदे –
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – एकूण जागा – 3

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

– क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तर अशा उमेदवारांसाठी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे.

जर मुलाखतीच्या वेळी कोणताही पदव्युत्तर शिक्षण घेतलेला उमेदवार प्राप्त झाला नाही तर अशावेळी MBBS उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

प्राधान्य कोणाला?

उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर इथून प्राप्त केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय महाविद्यालयातून केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

निवड प्रक्रिया –

थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

मुलाखतीवेळी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे

त्यानंतर उमेदवारांना पुढच्या सर्व मुलाखतींसाठी उपस्थित राहावं लागेल.

मुलाखतीची तारीख – 23 सप्टेंबर 2021

सविस्तर माहितीसाठी – https://vmgmc.edu.in/news/Advertised-for-the-post-of-CMO-18092021.pdf

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://vmgmc.edu.in/

मुलाखतीचा पत्ता – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर.

Web Titel :- GMC Solapur Recruitment 2021 | government medical college gmc solapur recruitment 2021 openings for medical posts apply here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बुवाबाजी करून पती, सासू, सासऱ्याने सुनेला पाजलं कोंबडीचं रक्त; त्यानंतर केला ‘हा’ भयंकर प्रकार

Gondia Crime | कुटुंबातील तिघांची हत्या करुन स्वत:लाही संपवलं; जिल्ह्यात प्रंचड खळबळ

Sana Gulwani | 27 वर्षीय हिंदू मुलीने पाकिस्तानात रचला इतिहास; पहिल्याच प्रयत्नात प्रशासकीय सेवा परीक्षा पास