‘रनवे’वरून थेट गवतात उरतलं ‘विमान’, पायलटनं वाढवला ‘स्पीड’ अन्… (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील नागपूरहून बेंगळुरूला उड्डाण करणारे गो एअरचे विमान लँडिंगच्या वेळी धावपट्टीवरून घसरले. 11 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून पायलटला चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. खराब हवामानामुळे जेव्हा विमानाने बेंगळुरूला लँडिंग करायला सुरुवात केली तेव्हा ते धावपट्टीवरून शेतातील गवताळ भागात गेले. लँडिंगच्या वेळी, विमानात 180 पेक्षा जास्त प्रवासी आणि क्रू मेम्बर्स होते. सर्व प्रवासी आणि क्रू मेम्बर्स सुरक्षित आहेत.

गो एअरच्या ए 320 विमानांच्या लँडिंगची चौकशी करण्याचे आदेश एअरलाइन्स एजन्सी DGCA ने दिले आहेत. तसेच पायलटलाही निलंबित करण्यात आले आहे.

सोमवारी अतिशय खराब हवामान असतानादेखी नागपूरहून विमानाचे उड्डाण करण्यात आले. कठीण परिस्थितीत गो एअरच्या विमानाचे लँडिंगदेखील अत्यंत धोकादायक होते. म्हणूनच विमान धावपट्टीवरून घसरून उंच-सखल गवताळ जागेत उतरले. तथापि, वैमानिकाने तेथे विमान थांबवले नाही आणि विमानाचा वेग वाढविला आणि थेट हैदराबादला नेले, जिथे त्याचे कनेक्टिंग उड्डाण होते. विमानाची हैदराबादमध्ये सुरक्षित लँडिंग झाली.

याच विमानात बसलेल्या एका व्यक्तीनेही ट्विटरवर या धोकादायक लँडिंगचा व्हिडिओ पोस्ट करुन लिहिले आहे की हे विमान बेंगळूरूमध्ये उतरू शकत नाही परंतु हैदराबादमध्ये उतरले आहे.

या घटनेबाबत गो एयरचे एक निवेदनही प्रसिद्ध झाले. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, विमानात बसलेले प्रवासी, क्रू मेंबर्स सर्व सुरक्षित आहेत.

Visit : Policenama.com