‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही’, ‘कोरोना’ लसीवरून MP सुळेंचा PM मोदींना टोला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नही, असे विधान करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule) यांनी मोदीवर निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लस मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी (दि. 28) कोरोनावरील लसीचे उत्पादन करत असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटसह अहमदाबाद आणि हैदराबादमधील संशोधन संस्थांचा दौ-यावरून खा. सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

खा. सुळे म्हणाल्या की, लाखो, करोडोंच्या गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. अखेरीस पु्ण्यामध्येच या कोरोनावरील लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. नाहीतर कुणीतरी म्हणेल की, मीच शोधली आहे म्हणून, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी मोदींना टोला लगावला आहे. दरम्यान, सुळे यांनी याआधीही पुणे दौऱ्यावरून पंतप्रधानावर टीका केली होती. आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर महत्त्वपूर्ण काम होत आहे आणि ते पाहण्यासाठी पंतप्रधान येत आहेत यापेक्षा आपल्या सरकारचे मोठे यश काय असू शकते असे विधान त्यांनी केले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांयकाळी पावणे पाच वाजता ‘कोव्हीशिल्ड’ या कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ इन्स्टिट्यूटला भेट दिली. भेटीत मोदी यांनी कोरोना लसची निर्मिती व वितरण प्रक्रियेबाबत माहिती घेतली. या सव्वा तासांच्या भेटीनंतर मोदी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुणे विमानतळाकडे रवाना झाले.

You might also like