‘या’ देशांचे ३५ हजार म्हणजे भारतातील १०० रूपये, ‘करोडपती’ बनून ‘सफर’ करा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण भारतीय रुपयाबाबत कायमच तक्रार करतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय रुपयाला खूप कमी किंमत आहे. त्यामुळे परदेशात फिरायला जाताना आपण बराच विचार करतो. परंतू जर इतिहास पाहिला तर १ रुपया १ डॉलरच्या बरोबर होता.

आता मात्र १ डॉलरची किंमत ६५ ते ७० रुपया दरम्यान आहे. परंतू काही असे देश आहेत जिथे रुपया मोठा आहे. म्हणजेच रुपयांची किंमत अधिक आहे. त्यामुळे जर तुम्ही परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर काही सुंदर असे देश तुमची वाट पाहत आहे. जिथे भारतीय रुपयांची किंमत अधिक आहे आणि तेथे तुम्ही एखाद्या श्रीमंत व्यक्ती सारखे राहू शकाल.

१. इंडोनेशिया –

१ रुपया – २०७.७८ इंडोनेशियन रुपया

इंडोनेशिया निळाशार समुद्रसाठी प्रसिद्ध आहे, इंडोनेशिया त्या देशामधील देश आहे जेथे भारतीय रुपयांची किंमत अधिक आहे. याशिवाय येथे भारतीयांना मोफत विजा देण्यात येतो. म्हणजेच जास्त खर्च न करता तुम्ही या सुंदर देशात पर्यटनासाठी जाऊ शकतात.

२. व्हिएतनाम –

१ रुपया – ३५५.०४ व्हिएतनामी डोंग

हा एक असा देश आहे जिथे खूप जुनी अशी बौद्ध संस्कृती आहे. येथे सुंदर नद्या आणि व्हिएतनामी संस्कृती आहे. विएतनाम भारतीयासाठी सुंदर अशी जागा आहे कारण तेथील संस्कृती भारतीय संस्कृती पेक्षा बरीच वेगळी आहे. भारतापासून व्हिएतनाम जास्त दूर देखील नाही आणि स्वस्त देखील आहे. येथील यु्द्ध संग्रहालय आणि फ्रेंच वास्तूकला आकर्षणाचे केंद्र आहे.

३. कंबोडिया –

१ रुपया – ६३.२४ कंबोडियन रियाल

कंबोडिया आपल्या विशाल अंगकोर वाट मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय नागरिक येथे कमी खर्चात फिरु शकतात. येथे रॉयल पॅलेस, राष्ट्रीय संग्रहालय आकर्षणाचे केंद्र आहे. पश्चिमात्य पर्यटकांसाठी कंबोडिया प्रसिद्ध स्थळ आहे. भारतीयामध्ये देखील या देशाची लोकप्रियता वाढत आहे.

४. श्रीलंका-

१ रुपया – २.३९ श्रीलंकन रुपया –

समुद्र किनारे, डोंगर दऱ्या, हिरवळ आणि ऐतिहासिक स्मारकांसाठी श्रीलंका ओळखले जाते. भारतीयांसाठी उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी हे स्थळ लोकप्रिय आहे. तसेच श्रीलंका भारताच्या जवळ आहे. तेथे जाणाऱ्या विमान सेवा देखील स्वस्त आहेत.

६. नेपाळ –

१ रुपया – १.६० नेपाळी रुपये

येथे अनेक आश्चर्य कारक ठिकाणे पहायला मिळतात. नेपाळ मध्ये माऊंटन एवरेस्ट आणि इतर ७ उंच पर्वत आहेत. जे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. तसेच भारतींना नेपाळला जाण्यासाठी विजा देखील लागत नाही.

६. आइसलँड –

१ रुपया – १.६५ आइसलँड क्रोना –

हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण मानले जाते. उन्हाळ्यात जर तुम्ही फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर हा देश तुमच्यासाठी उत्तम आहे. आइंसलँड त्यांच्या निळ्याशार समुद्राच्या पाण्यासाठी, झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

७. हंगेरी –

१ रुपया – ३.९९ हंगेरियन फॉरिंट

हंगेरी मधील वास्तूकला आणि तेथील संस्कृती खूपच लोकप्रिय आहे. ही संस्कृती रोमन, तुर्की आणि इतर संस्कृतींनी प्रभावित आहे. येथील महाल हे आकर्षणाचे केंद्र आहे. हंगेरीतील बुद्धापेस्टा जगातील सर्वात रोमांटिक शहर मानले जाते.

९. जपान –

१ रुपया – १.७० जपानी येन

जपानचे सुशी आणि चेरीचे फूल हे कायमच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. हा अशा देशांमधील देश आहे जिथे भारतीय रुपयांचे मूल्य अधिक आहे. जपान असा देश आहे जेथील संस्कृती खूप जुनी आहे.असे असले तरी तेथील तंत्रज्ञान तेवढेच दर्जोदार आहे. येथील तंत्रज्ञान, धार्मिक स्थळ आणि राष्ट्रीय उद्याने पर्यटकामध्ये लोेकप्रिय आहे.

९. पॅराग्वे –

१ रुपया – ८८.४८ पॅरागुएआन गुआरानी

पॅराग्वे देश दक्षिण अमेरिकेत स्थित देश आहे. पॅराग्वे तेथील निसर्गासाठी आणि भौतिकवादासाठी प्रसिद्ध आहे. येथून ब्राझील आणि अर्जेटिंना हे देश जवळ आहे.

१०. मंगोलिया –

१ रुपया – ३१.८४ मंगोलियन तुगरिक

मंगोलिया एक विशाल जागा आहे जिथे तुम्ही खुल्या निसर्गाची मजा घेऊ शकतात. निळ्या आकाशाची जमीन असे देखील मंगोलियाला म्हणले जाते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ज्याला कोणाला आराम, शांतता हवी असेल तर त्याच्या साठी ही योग्य जागा आहे. आपण येथे एकांत मिळवू शकतात.

११. कोस्टा रिका –

१ रुपया – ९.०३ कोस्टा रिकन कोलोन

हा देश मध्य अमेरिकेत असून समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या कडे अनेक पर्यटक आकर्षित होतात. ज्वालामुखी, जंगले, वन्यप्राणी यांच्यामुळे हा देश पर्यटकांसाठी लोकप्रिय ठरतो.

१२. पाकिस्तान –

१ रुपया – १.६५ पाकिस्तानी रुपया

भारतातूनच निर्माण झालेल्या या देशात खूप कमी लोग पर्यटनासाठी जातात. पाकिस्तानात अनेक सुंदर अशी स्थळ आहेत आणि ते कमी पैशात फिरून होतात. पाकिस्तानातील लाहोर, कराची ही पाहण्या लायक ठिकाणे आहेत.

१३. चिली

१ रुपया – ९.६४ चिली पेसो

चिलीमध्ये जंगलांचा आणि ट्रेकिंगचा आनंद घेणे हा सुखद अनुभव आहे. चिलीतील पर्वतीय दुश्य लक्षणीय आहेत. तसेच येथे सक्रिय ज्वालामुखी देखील आहेत. लेक जिल्हा चिलीतील प्रसिद्ध ठिकाण आहे. चिलीतील शेती, नद्या, डोंगर दऱ्या खूपच आकर्षित आहेत.

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार