श्रीमंत व्हायचं आहे या गावात जा !  भारतातील शेवटचं गाव.  

वृत्तसंस्था : असा समज आहे कि गावाकडे राहणारी बरीच लोक ही गरीब असतात, तिथे सगळ्या गोष्टी स्वस्त असतात म्हणून ते गावाकडे राहतात. पण उत्तराखंड मध्ये बद्रीनाथ पासून चार किलोमीटर दूर भारतातील शेवटचे गाव ‘माणा’ आहे. पण असं म्हणतात की या गावात गेलं तर माणसाची गरिबी संपून जाते आणि तो श्रीमंत होतो. असे म्हणले जाते की या गावावर भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाला आहे. चीनच्या सीमेला लागलेले उत्तराखंडचे हे शेवटचे गाव आहे. तसे पाहिले तर या गावाचा इतिहास महाभारत काळापासुन आहे. असे सांगितले जाते की, या गावातुनच पांडव स्वर्गात गेले होते. जाणून घ्या या ऐतिहासीक गावाबद्दल पूर्ण माहिती.

– गावाचे जुने नाव मणिभद्र आहे. पर्यटक येथे अलकनंदा आणि सरस्वती नदीचे संगम पाहायला येतात. त्याशिवाय गणेश गुफा, व्यास        गुफा आणि भीमपुलदेखील आकर्षणाचे ठिकाण आहे.

– मे ते ऑक्टोबर दरम्यान येथे अनेक पर्यटक येतात. माणा गावात येण्याची ही सगळ्यात चांगली वेळ आहे. वर्षातील सहा महिने येथे        पर्यटकांची ये-जा सुरूच असते. बद्रीनाथ धामचे कपाट बंद झाल्यावर येथे जाणे- येणे बंद होते.
– येथे सरस्वती नदीवर ‘भीम पुल’ आहे. असं सांगतात की  जेव्हा पांडव स्वर्गात जात होते, तेव्हा त्यांनी सरस्वती नदीकडे पुढे जाण्यासाठी
रस्ता मागितला होते, पण जेव्हा नदिने नकार दिला तेव्हा भीमने दोन मोठ्या शिळा उचलल्या आणि नदीवर ठेवल्या, त्यामुळेच याला        भीम पुल म्हणतात. या पुलावरूनच चालत पांडव स्वर्गात गेले होते.

– एका अजून प्रचलीत गोष्टीनुसार, भगवान गणेश जेव्हा वेद लिहीत होते तेव्हा सरस्वती नदीच्या आवाजाने त्यांना त्रास होत होता तेव्हा        त्यांनी सरस्वती नदीला विनंती केली की, आवाज कमी कर पण नदीने नकार दिला तेव्हा त्यांनी तिला श्राप दिला की, यानंतर तु कधीच      कोणलाय दिसणार नाहीस.
– तर व्यास गुफेबद्दल सांगितले जाते की, महर्षि वेद व्यास यांनी इथे वेद, पुराण आणि महाभारताची रचना केली आणि भगवान गणेशांनी    ते लिहीले.

असे जाता येते माणा गावात
– हरिद्वार आणि ऋषिकेशपासून माणा गावापर्यंत एनएच 58 वरून जाता येते.
– तेथून सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन हरिद्वार आहे, जे 275 किलोमीटरवर आहे.
– हरिद्वारवरून तुम्ही बस, टॅक्सी किंवा कॅबने माणा गावात जाऊ शकता.