Goa Accident | गोव्याच्या खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील शुभम देडगे व ईश्वरी देशपांडेचा मृत्यू

म्हापसा : वृत्तसंस्था –  Goa Accident | गोव्याच्या बार्देश तालुक्यातील हडफडे येथे खाडीत कार बुडून भीषण अपघात (accident) झाला. या अपघातात पुण्यातील दोघा तरुण-तरुणीचा मृत्यु झाला आहे. कारमधील प्रवासी आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी आर्त हाक देत होते. मात्र, पहाटेची वेळ असल्यानेच त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. हा अपघात आज सोमवारी पहाटेच्या सुमारास झाला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी हे दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले आहेत.

याबाबत माहिती अशी, शुभम देडगे (वय, 28) व ईश्वरी उमेश देशपांडे (वय, 25) अशी मृतांची नावे आहेत.
हा अपघात (accident) पार्क रिव्हर हॉटेल नजीकच्या खाडीजवळ घडला.
यावेळी सदर भरधाव गाडीने अगोदर एका झाडाला धडक दिल्यानंतर कारने 50 ते 60 मीटरपर्यंत कोलांट्या घेत ती जवळील खाडीत बुडाली.
अपघातानंतर वाहनामधील या मृत युवतीने आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा अशी मदतीची साद घातली. असे घटनास्थळी जमलेल्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान पहाटेच्या वेळेत त्यांना मदत मिळाली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती अग्नीशमक दलाला दिली असता जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र, जवानांना संबंधितांना वाचविता आले नाही.
अग्नीशमन दलाने या वाहनांचे लॉक मोडून दोघांचे मृत्यूदेह बाहेर काढले.
तसेच हणजूण पोलिसांनी पंचनामा करीत क्रेनच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढली.

 

Web Title : Goa Accident | Car sinks in Goa Bay Death of Shubham Dedge and Ishwari umesh Deshpande from Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kirit Somaiya | ‘हसन मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा’ अशी सुचना त्यांनी केलीय – किरीट सोमय्या

Crime News | ‘इव्हेंट’ अँकरवर सामुहिक बलात्कार ! घटना CCTV मध्ये कैद, प्रचंड खळबळ

Post Office Scheme | 1500 रुपये महिना करा जमा, मिळतील 35 लाख रुपये; जाणून घ्या सर्वकाही