Goa Assembly Result | गोव्यात भाजपचा विजय ! फडणवीसांनी विजयाचे श्रेय दिले ‘या’ दोन व्यक्तींना, स्वत:चं नाव नाही घेतलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज लागला. पंजाब (Punjab) वगळता इतर सर्व राज्यांमध्ये भाजपला (BJP) सत्ता राखण्यास यश आले आहे. गोव्यामध्ये निवडणुकीच्या (Goa Assembly Result) सुरुवातीच्या काळात भाजप – काँग्रेस (Congress) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यानंतर आता भाजपने बढत घेतली असून गोव्यात भाजपनं बहुमताचा (Goa Assembly Result) आकडा गाठला आहे. भाजप 40 पैकी 21 तर 12 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. या विजयानंतर गोव्याचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

युपीसह (UP) गोव्यातील विजयानंतर (Goa Assembly Result) देशभरातून भाजपवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातवरण पाहायला मिळत आहे. गोव्याचे प्रभारी असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील विजयाचं श्रेय दोघांना दिले आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant) यांना. गोव्यात एन्टीइंन्कबन्सचा परिणाम होईल, भाजपची पिछेहाट होईल, असे अनेकांना वाटत होते. परंतु गोव्यात भाजपनं मोठं यश मिळवलं आहे.

 

नरेंद्र मोदींनी देशात जो विश्वास तयार केला आहे, त्याचा हा परिणाम आहे. याशिवाय प्रमोद सावंत यांनी गोव्यात डबल इंजिनने ज्या पद्धतीने सरकार चालवले, त्यामुळे जनतेचा विश्वास संपादन केला. यामुळे गोव्यातील या विजयाचे श्रेय नरेंद्र मोदी आणि प्रमोद सावंत यांचेच असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीसांनी आखली रणनीती
गोव्यात भाजपने देवेंद्र फडणवीस यांना निवडणूक प्रभारी केले होते.
फडणवीस यांनी गोव्यात भाजपला बहुमत मिळवण्यासाठी रणनीती आखली.
तीच भाजपच्या यशातून पहायला मिळत आहे. गोव्यात मागील वेळी बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपाने यंदा बहुमत गाठल्याचे दिसत आहे.

 

गोव्यात भाजपचे सरकार येणार
गोव्यातील या निकालाबाबत बोलताना भाजप आमदार गिरीश महाजन (BJP MLA Girish Mahajan) म्हणाले, गोव्यात भाजपचं सरकार (BJP Government) येणार आहे.
त्यात कुठलंही दुमत नाही. संख्या कमी – अधिक होईल.
पण गोव्यात भाजपाचं सरकार होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title :- Goa Assembly Result | goa assembly result devendra fadnavis attributed the victory in goa to both of them not taking his own name

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा