Goa Beach | गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून गोंधळ ! ’रात्रभर बीचवर का होत्या मुली’… गँगरेपवर असंवेदनशील वक्तव्य

पणजी : गोव्यात समुद्र किनार्‍यावर (Goa beach) दोन अल्पवयीन मुलींवर (minor girls) सामूहिक बलात्काराची (gang raped) घटना घडली आहे. या प्रकरणावर विधानसभेत भाजपाचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (BJP Chief Minister Pramod Sawant) यांच्या वक्तव्या (statement) ने गोंधळ उडाला आहे. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत म्हटले होते की, आई-वडीलांना आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे की त्यांची मुले संपूर्ण रात्रभर बीचवर (Goa beach) काय करत होती. या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे आणि हे वक्तव्य लाजीरवाणे असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लक्षवेधी नोटीसवर चर्चा करताना बुधवारी म्हटले, जेव्हा 14 वर्षाची मुले संपूर्ण रात्रभर समुद्रकिनार्‍यावर राहातात, तेव्हा आई-वडीलांना आत्ममंथन करण्याची आवश्यकता आहे. मुले ऐकत नाहीत, केवळ यासाठी सरकार आणि पोलीसांवर जबाबदारी टाकू शकत नाही.

आई-वडीलांची सुद्धा जबाबदारी

गृह विभागाची सुद्धा सांभाळत असलेल्या सावंत यांनी म्हटले की, आपल्या मुलांची सुरक्षा ठरवणे आई-वडिलांची जबाबदारी आहे. त्यांनी आपली मुले विशेषता अल्पवयीन मुलांना रात्र-रात्रभर बाहेर राहू देऊ नये.

विरोधक झाले आक्रमक

काँग्रेसच्या गोवा युनिटचे प्रवक्ते अल्टोन डी कोस्टा यांनी गुरुवारी म्हटले की गोव्यात कायदा आणि व्यवस्था बिघडली आहे. रात्री बाहेर फिरताना आम्ही का घाबरायचे? गुन्हेगारांनी जेलमध्ये असायला हवे आणि कायद्याचे पालन करणार्‍या नागरिकांनी बाहेर फिरायला हवे.

हे देखील वाचा

Maharashtra Unlock | राज्य अनलॉक होणार? टास्क फोर्ससोबत CM ची बैठक, डॉक्टरांनी मांडलं ‘हे’ मत, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष

Pune Crime | डायस प्लॉटमध्ये माझे ‘राज’ चालणार म्हणणार्‍या ‘जीएसटी’ गँगच्या प्रमुखाला अटक; तरुणावर कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Goa Beach | on beach whole night row over goa chief minister s remark in rape case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update