Video : गोव्यात भाजपाच्या आमदाराची ‘लॉकडाउन’ पार्टी, व्हिडिओ व्हायरल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गोव्यातील सत्ताधारी भाजपाच्या आमदाराने दारु पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये बार्देस तालुक्यातील हळदोणा मतदारसंघाचे आमदार ग्लेन टिकलो हे ‘मद्य पार्टीत’ सहभागी झालेले दिसत असून याप्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे.

ऐन कोरोनामध्ये आमदार ग्लेन टिकलो व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दारु पार्टीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पार्टीदरम्यान मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन झालेे आहे. ‘ही लॉकडाउन पार्टी’ आहे असे म्हणतानाही या व्हिडिओमध्ये ऐकायला येत आहे. दारुच्या बाटल्या हातात घेऊन काही नाचताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गोवा काँग्रेसने यावरुन जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेची चौकशी केली जाईल असे सांगितले आहे. राज्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही नॉर्थ गोवा प्रशासनाने खासगी पार्टीसाठी परवानगी दिली नसल्याचे सांगितले आहे .