गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अतिशय चिंताजनक

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांचा रक्तदाब कमालीचा कमी झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. ते ६४ वर्षांचे आहेत.

पर्रीकर हे स्वादुपिंड्याच्या आजाराने गेले वर्षभर आजारी आहेत. अमेरीकेत, मुंबईत आणि दिल्लीतही त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. त्यांनतर गेले चार महिने ते घरीच उपचार घेत आहेत. मध्यंतरी त्यांच्या फुफ्फुसात पाणी झाल्याने त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास झाला होता.

पर्रीकर यांनी मुंबईतील आयआयटीमधुन मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झालेले पर्रिकर १९९४ मध्ये गोवा विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले. ते जून ते नोव्हेंबर १९९९ या काळात विरोधी पक्ष नेते होते.

ऑक्टोबर २००० मध्ये ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. मोदी यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्रीही (२०१४-१७) होते. केंद्रात ते संरक्षणमंत्रीही असताना सर्जिकल स्ट्राईक सारखा महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ते केंद्रात फार काळ रमले नाहीत . मार्च २०१७ मध्ये ते पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us