गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पणजी : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 40 लाखाच्या आसपास पोहचली आहे. अनेक लोकप्रतिनिधी कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती स्वत: प्रमोद सावंत यांनी ट्विट करून दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, असे आवहन देखील त्यांनी केले आहे.

आपण होम आयसोलेशनमध्ये राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. प्रमोद सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्हि आली आहे. मात्र, माझ्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत. त्यामुळे मी होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. मी घरातूनच काम करणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.