दुर्दैवी ! गोव्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 26 रुग्णांचा मृत्यू

पणजी : पोलीसनामा ऑनलाइन –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. ऑक्सिजन, व्हेटिलेटर बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन यांसारख्या आरोग्य सेवा-सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच आता गोव्यात ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने 26 रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

गोवा मेडिकल कॉलेज रुग्णालयात ही घटना घडली. गोव्यात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 20 ते 30 रुग्ण दगावले आहेत. त्यानंतर आजही 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यात त्रुटी असल्या कारणाने ही घटना घडली असावी, अशी शक्यता व्यक्त केली आहे. डॉक्टरांचा बेजबाबदारपणा किंवा उशीरा डॉक्टर पोहोचले म्हणून ही घटना घडली असे म्हणता येणार नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने काल रात्री 2 वाजल्यापासून 6 च्यादरम्यान गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन कमी असल्याची सूचनाही दिली होती, अशी माहिती दिली जात आहे.

दरम्यान, दिल्ली, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतही ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने रुग्ण दगावल्याची घटना घडत आहे. त्यानंतर आज ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने चार तासांत 26 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पूर्ण घटनेचे चौकशीचे आदेश दिले आहेत.