Goa Election Results | गोव्यात राष्ट्रवादी, शिवसेनेचा धुव्वा ! नोटापेक्षा कमी मते मिळाली, जाणून घ्या आकडेवारी

पणजी : वृत्तसंस्था – Goa Election Results | महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने (Shivsena) गोव्यात भाजपविरोधी (BJP) दंड थोपटल्याने तसेच संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते गोव्यात ठाण मांडून होते. गोव्याच्या निकालाकडे (Goa Election Results) महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra political) वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र 2017 प्रमाणे यावेळीही शिवसेनेच्या पदरात निराशा पडली आहे. शिवसेनेला गोव्यात केवळ 0.2 टक्के तर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला केवळ 1 टक्का मते मिळाली आहेत. दोन्ही पक्षांपेक्षा गोव्यात नोटाला (Nota) 1.13 टक्के मते मिळाली आहेत.

 

गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येत निवडणूक लढवली होती.
शिवसेनेकडून भाजप आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडण्यात आली होती.
तसेच शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांची गोव्यात मोठी सभा झाली होती.
मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे आजच्या निकालावरुन (Goa Election Results) दिसत आहे. गोव्याच्या एकाही मतदारसंघात शिवसेना आणि त्यांचा सहकारी पक्ष राष्ट्रवादीला आघाडी मिळवता आली नाही. तसेच एकूण मतदानापैकी शिवसेनेला केवळ 0.2 टक्के मते मिळाली आहेत. तर राष्ट्रवादीच्या खात्यात 1.11 टक्के मते गेली.

 

दरम्यान, आतापर्यंतच्या निकालानुसार सर्वाधिक 33.1 टक्के घेऊन भाजपने 19 जागांवर आघाडी घेतली आहे.
तर काँग्रेसला (Congress) 22.9 मतांसह 11 जागांवर आघाडी मिळाली आहे.
मगोपला 3, आपला 2, गोवा फॉरवर्डला 1, रिव्होल्युशनरी गोवन्सला 1 आणि अपक्षांना 3 जागांवर आघाडी मिळाली आहे.

 

Web Title :- Goa Election Results | goa assembly election result 2022 shiv sena ncp washed out in goa received less votes than

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा