Goa Election Results | पणजीतून उत्पल पर्रिकर पराभूत, BJP च्या बाबूश मोन्सेरात यांनी मारली बाजी

पणजी : वृत्तसंस्था – Goa Election Results | गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) भाजपने (BJP) पणजी मतदारसंघातून (Panaji Constituency) उमेदवारी नाकारल्याने पक्षाविरोधात दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (CM Manohar Parrikar) यांचे बंडखोर पुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांचा पराभव (Goa Election Results) झाला आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु या निवडणूकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पणजीतून भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrat) हे विजयी झाले आहेत.

 

भाजपने पणजीतून उत्पल पर्रिकर यांची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करत पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूकीच्या रिंगणात उतरले (Goa Election Results) होते. त्यामुळे पणजीत नक्की काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. ही लढत अटीतटीची झाली. सुरुवातीच्या टप्प्यात उत्पल पर्रिकर यांनी आघाडी घेतली. मात्र, मतमोजणीच्या फेऱ्या जसजशा पुढे सरकू लागल्या तसे पर्रिकर हे पिछाडीवर पडले. अखेर या लढतीत उत्पल पर्रिकर यांचा अवघ्या 800 मतांनी पराभव झाला.

 

बाबुश मोन्सेरात यांचा विजय हा गोवा निवडणुकीचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या रणनीतीला मिळालेले मोठे यश मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे बाबुश मोन्सेरात यांना पणजीतून उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. भाजपने त्यांना अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पर्याय दिला होता. परंतु उत्पल हे पणजीतून लढण्यावर ठाम होते. याच वादातून ते भाजपमधून बाहेर पडत अपक्ष लढले.

उत्पल पर्रिकर यांना शिवसेनेने (Shivsena) पाठिंबा जाहिर केला होता. त्यांच्यासाठी पणजीतील शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली होती. पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे सुपूत्र आहेत. मनोहर पर्रिकर यांचे भाजप पक्ष गोव्यात रुजवण्यात महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे पणजीत उत्पल पर्रिकर यांना मोठा जनाधार असल्याचे मानले जात होते. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत पर्रिकर यांना त्यांचा फारसा फायदा मिळालेला दिसत नाही.

 

अपक्ष उमेदवार म्हणून मी चांगली लढत दिली.
मी लोकांचे आभार मानतो. मी निकालामुळे नक्कीच निराश आहे, अशी पहिली प्रतिक्रिया पर्रिकरांच्या मुलाने दिली आहे.
उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी न मिळाल्याने चर्चा देश पातळीवर झाली होती. त्यामुळे पणजी येथील निवडणूक प्रतिष्ठेचा विषय ठरला होता.

 

गोवा विधानसभेत 40 जागा
गोवा विधानसभेत एकूण 40 जागा आहेत. बहुमतासाठी 22 जागा आवश्यक आहेत.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस (Congress) 11 तर भाजप 20 जागांवर आघाडीवर आहे.
तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (Maharashtrawadi Gomantak Party) 4, आप 2 आणि अपक्ष तीन जागांवर आघाडीवर आहेत.
भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे आता भाजप एकहाती सत्तास्थापन करणार का, हे पाहावे लागेल.

 

Web Title :- Goa Election Results | goa assembly election results utpal parrikar defeated by bjp babush monserrate in panaji constituency

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा