वडील गेल्यानंतर पक्षातील ‘विश्वास’ आणि ‘वचनबद्धता’ शब्द संपले, मनोहर पर्रीकरांच्या मुलाची भाजपवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या १० आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने उत्पल पर्रीकर यांनी भाजपवर निशाणा साधालाय. वडीलांच्या निधनानंतर पक्षाने आता दुसरा मार्ग स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप मधून विश्वास आणि वचनबद्धता सारखे शब्द संपले आहेत असा निशाणा उत्पल पर्रिकर यांनी पक्षावर साधला आहे.

उत्पल पर्रीकर यांनी म्हटले आहे की, माझे वडील जिवंत असताना पक्षात विश्वास आणि वचनबद्धता सारख्या शब्दांना महत्व होते. पक्षाची काही मुल्ये होती. परंतू १७ मार्च नंतर हे दोन्ही शब्द पक्षातून गायब झाले आहेत. १७ मार्चनंतर पक्षाने वेगळीच दिक्षा पकडली आहे. आता योग्य काय हे वेळच सांगेल?

गोवा विधानसभेत काँग्रेसचे १५ आमदार आहेत. त्यातील १० आमदारांनी भाजपात समावेश केला. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले की, काँग्रेसचे १० आमदार भाजपात सहभागी झाले आहेत. राज्याचा आणि आपल्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यासाठी त्यांच्यावर कोणतीही अट टाकण्यात आली नाही. कोणत्याही अटी शिवाय त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

‘खसखस’मुळं होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

पेरू खाल्यामुळं ‘हा’ आजार मुळापासून होतो ‘गायब’

दुधी भोपळा ‘वरदान’ ठरतयं मधुमेह, कावीळ आणि मूत्रपिंडांच्या रूग्णांसाठी, जाणून घ्या

‘व्होडका’त अनेक औषधी गुणधर्म, विविध समस्यांवर लाभदायक !

लग्नाच्या आधी HIV टेस्ट : सरकार बनवणार नवा कायदा