जवाहरलाल नेहरूंमुळेच ‘गोवा’मुक्तीस ‘उशीर’ ! काश्मीरच्या बाबतीतही ‘तेच’ केेलं : शिवराज सिंह चौहान

पणजी : वृत्तसंस्था – भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हेच गोवा मुक्तीसाठी विलंब होण्यास कारणीभूत असल्याचे मत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केले. तसेच गोव्यासारखीच नीती नेहरूंनी काश्मीरच्या बाबतीत वापरल्याने काश्मीर प्रश चिघळल्याचा आरोपही चौहान यांनी केला. भाजपा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी स्पष्टीकरण देताना चौहान यांनी सांगितले की, ‘भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगिजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यांतच राहिला. गोवा मुक्त करणे त्यावेळी केंद्र सरकारची जबाबदारी मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यासाठी काहीच केले नाही. गोमंतकीय मात्र स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढत होते.’ हेच काश्मीरच्या बाबतीतही झाले असून राजा हरिसंग यांनी काश्मीर भारतात सामाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतरही ३७० कलमांतर्गत विशेष दर्जा देऊन काश्मीर प्रश्न लटकत ठेवण्यात आला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघात जाऊन युद्धबंदी करण्याची घाई देखील नेहरूंनी केली. अन्याथा पाकीस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग आपल्या लष्कराने पारत मिळवला असता असे देखील त्यांनी सांगितले.

काँग्रेसने कलम ३७० वर भूमिका स्पष्ट करावी :
कॉंग्रेसने कलम ३७० मुद्द्यावर भुमिका स्पष्ट करण्याची मागणीदेखील चौहान यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४८ तासात कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला जो काँग्रेसला ७० वर्षांमध्ये देखील घेता आला नाही. यावेळी त्यांनी राहुल गांधींसाठी रणछोडदास असे विशेषण देखील वापरले. त्यामुळे या मुद्यावर नेमकी कोणती भुमिका घ्यावी या बाबत कॉंग्रेस गोंधळात असून कॉंग्रेसचे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like