Goa Mumbai Highway | खारेपाटणमध्ये भीषण अपघात ! पुलावरुन कंटेनर थेट नदीत कोसळला, दोघांचा जागीच मृत्यु

खारेपाटण : पोलीसनामा ऑनलाइन  – गोवा -मुंबई महामार्गावरील (Goa Mumbai Highway) खारेपाटण येथील मुख्य पुलावरुन वेगाने जाणारा कंटेनर थेट नदी पात्रात कोसळला. त्यात कंटेनरमधील चालक व वाहक यांचा जागीच मृत्यु झाला आहे.

हा कंटेनर गोव्याकडून -मुंबईकडे चालला होता. कंटेनरमध्ये सिपला कंपनीची औषधे होती. रात्रीच्या वेळी वेगाने जात असताना चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले व हा कंटेनर खारेपाटण पुलावरुन सुमारे ८० फुट खोल नदीच्या पाण्यात कोसळला (Goa Mumbai Highway). नदीच्या पाण्यात कोसळताना झालेल्या आवाजामुळे लोकांना ही घटना लक्षात आली. नदीमध्ये पाणी असल्याने तसेच प्रवाह मोठा व रात्रीचा काळोख यामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. दोर्‍यांच्या सहाय्याने नागरिक व पोलिसांनी कंटेनरमधील दोघांना बाहेर काढले. अपघातात वाहन चालक व वाहक या दोघांचा ही मृत्यु झाला होता. मृतदेह खोरपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले.

Web Title :- Goa Mumbai Highway | Terrible accident in Kharepatan! The container fell directly into the river from the bridge, killing both on the spot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा