Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकार्‍यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan| एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena Eknath Shinde) सर्वात मोठी बंडखोरी करून राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. या संपूर्ण सत्तांतर नाट्यादरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, त्या अजूनही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहेत. शिंदे गटाचे बंडखोर आमदार गोव्यातून काल मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. मात्र, हे बंडखोर आमदार गोव्यात ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथून राष्ट्रवादीच्या 3 पदाधिकार्‍यांना गोवा पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. (Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan)

 

अटक करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पदाधिकार्‍यांनी शिवसेना बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते त्या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन पदाधिकार्‍यांनी बनावट ओळखपत्र तयार करुन प्रवेश केला होता. हॉटेलच्या तक्रारीनंतर पणजी पोलिसांनी त्यांना अटक केली.

 

काल बंडखोर शिंदे गटाचे आमदार कडेकोट पोलीस बंदोबस्तात गोव्यातून मुंबईत दाखल झाले आहेत. सुरतमधून गुवाहाटीत आणि नंतर गोव्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये या बंडखोर आमदारांना ठेवण्यात आले होते.

बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्यासाठी या हॉटेलमध्ये प्रवेश केलेल्या तीन पदाधिकार्‍यांमध्ये
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
तिघांनाही शनिवारी दुपारी पणजी पोलिसांनी अटक केली. बनावट ओळखपत्र दाखवून प्रवेश केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

सोनिया दुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी उरकला होता.
या घटनेने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते.
त्यावेळी सोनिया दुहान आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची तेथून सुखरुप सुटका केली होती.

 

Web Title :- Goa Police Arrested NCP Student Leader Sonia Duhan | goa police arrested ncp student leader sonia duhan likely she was trying to approach shivsena rebel mla

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut On Devendra Fadnavis | ‘बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद जर तुम्हाला खरोखर लाभले असते, तर…’

 

Pune Crime | पुण्यात शेततळ्यात बडून दोघा मुलांचा मृत्यु; धायरीतील खंडोबा देवस्थान माळ येथील घटना

 

Child Saving Plan | आई-वडिलांनी ‘या’ योजनेत रोज जमा करावे अवघे 67 रुपये, 5 वर्षात तुमचे मुल होईल लखपती