बिअरच्या बाटल्यांची झाकणे, वापरलेल्या सिगारेटची बट द्या आणि बिअर फ्री मिळावा

गोवा : वृत्तसंस्था – सुंदर समुद्रकिनारी सुट्टी घालावयाची असेल तर गोव्याचे नाव आवर्जून घेतले जाते. येथे केवळ देशातूनच नाही तर परदेशातून देखील पर्यटक येत असतात. पण गोवा सरकारची मात्र कचऱ्यामुळे डोकेदुखी वाढवली आहे. पण ही डोकेदुखी कायमची नाहीशी कारण्यासाठी भन्नाट डोक्यालिटी गोव्यात एकाने लढवली आहे. गोव्यात एका अशा बारची सुरुवात कारण्यात आली आहे जिथे तुम्हाला १० बिअरच्या बाटल्यांची झाकणे आणि वापरलेल्या सिगारेटच्या २० बट च्या बदल्यात एक बिअर दिली जाते. काही दिवसांपूर्वी समुद्र किनाऱ्यावर मद्यसेवन करणाऱ्यांना २ हजार रूपयांचा दंड भरावा लागेल, असा नियमही काढण्यात आला आहे. या नव्या कल्पनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान ज्या बार कडून ही स्कीम राबवण्यात आली आहे त्याचे नाव ‘वेस्ट बार’ असं आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी मरीन नावाच्या प्रायव्हेट बीच मॅनेजमेंट एजन्सीने वेस्ट बारची सुरूवात केली आहे. गोवापर्यटन मंत्रालयाने गोव्यातील समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याचं काम या एजन्सीकडे सोपवलं आहे. या मोहिमेची सुरूवात ३० जानेवारीला करण्यात आली आहे. बागा बीचवर झंझीबार शेकमध्ये या वेस्ट बारची सुरूवात करण्यात आली आहे.

‘लोकांना गोव्यातील दोन गोष्टी आकर्षित करतात. एक म्हणजे बीच आणि दुसरी म्हणजे बार. त्यामुळे पर्यटक ज्या गोष्टींसाठी इथे येतात त्यांना त्या द्या. कचरा जमा करण्या बदल्यात त्यांना मोफत बीअर दिली जाते. याने बीचवर कचरा होत नाही’. अशी माहिती ही संकल्पना पुढे आणणाऱ्या नोरीन वॅन होल्स्टीन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

वॅन होल्स्टीन सांगते की, वेस्ट बारची सुरूवात काही वर्षांपूर्वी नेदरलॅंडमध्ये केली होती. त्यानंतर ही संकल्पना जगभरात प्रसिद्ध झाली. ती सांगते की, सिगारेटचे बट, बॉटल्सची झाकणे, प्लास्टिकचे स्ट्रॉ या बदल्यातही लोकांना बीअर मिळणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like