खुशखबर ! फक्त 957 रूपयांमध्ये बुक करा फ्लाइटचं ‘तिकीट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये विमान प्रवासाचे तिकिट मिळत आहे. Go Air तुमच्यासाठी अत्यंत खास ऑफर आणत आहेत. या ऑफर अंतर्गत कंपनी तुम्हाला अनेक मार्गावर तिकिट उपलब्ध करुन देत आहे. कंपनी GoAir Go Fly Sale अंतर्गत 26 फेब्रुवारीपर्यंत अनेक मार्गांवर कमी दरात विमान तिकिट उपलब्ध करुन देत आहे. या सेल अंतर्गत तुम्हाला एअरलाइन्सच्या देशांतर्गत मार्गावर 957 रुपयांत विमान प्रवासाचे तिकिट मिळू शकते. तर इंटरनॅशनल फ्लाइटच्या तिकिटाची सुरुवात 5,295 रुपयांपासून होत आहे. हा सेल 11 मार्च ते 15 एप्रिल पर्यंतच्या प्रवासासाठी आहे.

या मार्गावर सर्वात स्वस्त तिकिट –
GoAir Go Fly Sale अंतर्गत कंपनी अहमदाबाद ते इंदौर पर्यंतच्या मार्गावर सर्वात स्वस्त म्हणजेच 957 रुपयांचे तिकिट देत आहे. तर बंगळूरु ते कोलंबो हे तिकिट फक्त 5,295 रुपयात तुम्ही बुक करु शकतात.

कोची ते बंगळुरु (1,059 रुपये), कोलकत्ता ते भुवनेश्वर (1,529 रुपये), इंदौर ते नवी दिल्ली (1,543 रुपये), पुणे ते बंगळुरु (1,590 रुपये), मुंबई ते बंगळुरु (1,654 रुपये), हैदराबाद ते गोवा (1.659 रुपये) असे ऑफर अंतर्गत तिकिटाचे दर आहेत.

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील तिकिट –
अबुधाबी ते कन्नूर (5,626 रुपये), दिल्ली ते बँकॉक (6232 रुपये), अबुधाबी ते मुंबई (6,286 रुपये) या सारख्या अनेक मार्गांवर स्वस्त दरात तिकिट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही फिरायला जाण्याचे नियोजन करु शकतात.