काँग्रेसमध्ये अनेक ‘माकडं’ जे उड्या मारण्यास तयार : गोव्याचे उपमुख्यमंत्री सरदेसाई

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी काँग्रेसच्या आमदारांची तुलना माकडांशी केली आहे. उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी यावेळी आमदारांची तुलना माकडांशी करताना काँग्रेसमधील १० आमदार भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

माकडांशी तुलना करताना ते म्हणाले कि, ज्याप्रमाणे माकडे इकडून तिकडे उड्या मारत असतात त्याप्रमाणे आमदार देखील एका पक्षातून उड्या मारत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असतात. सरदेसाई यांच्या या विधानावर उत्तर देताना काँग्रेसचे विधानसभेतील नेते चंद्रकांत कावळेकर यांनी या विधानाचा निषेध केला. त्यांनी म्हटले कि, जे लोकं असे म्हणत आहेत, ते स्वतःच माकडं आहेत.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कावळेकर यांनी म्हटले कि, काही वर्षांपूर्वी माणूस देखील माकड होता. त्यानंतर माकडानंतर मनुष्याचा विकास झाला. त्यामुळे त्यांना विचारायला हवे कि, माणूस पुन्हा माकड कसा झाला. तुम्ही त्या आमदारांना माकड कसे काय म्हणू शकता? ते स्वतःच माकड आहेत असे म्हणत त्यांनी सरदेसाई यांच्यावर वार केला. विजय सरदेसाई हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे असून त्यांचा पक्ष सध्या भाजपबरोबर सत्तेमध्ये असून गोवा सरकारमध्ये हे उपमुख्यमंत्री आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर गोव्यात सत्तास्थापनेसाठी भाजपने अनेक आमदार आणि पक्षांना सत्तेची लालूच दाखवत आपल्याकडे खेचले होते. त्याचबरोबर काँग्रेसने देखील याठिकाणी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला होता मात्र त्यांना त्यात अपयश आले.

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात

Loading...
You might also like