बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे : खरगे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

भाजप विरोधातल्या आघाडीत पंतप्रधान पदाचा उमेदवार संख्याबळावर ठरवणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. यावर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे, असे वक्तव्य केले आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’32ff2973-ac0f-11e8-becd-a18bbaca7ef7′]

खरगे म्हणाले, देशात भाजपविरोधी आघाडी उभारण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवरून चर्चा रंगली आहे. मात्र, भाजपासारख्या बलाढ्य पक्षाला सत्तेतून पायउतार करण्याच्या मुद्याला सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. देशात भाजप विरोधी वातावरण तयार करण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र केले पाहिजे. जेव्हा ही आघाडी भाजपाला हरवेल तेव्हाच नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे खरगे म्हणाले.

मराठा आरक्षण : विशेष अधिवेशनाची मागणी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा फेटाळली

भाजपचा पाडाव करण्यासाठी देशभरातल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासारखा समजूतदारपणा दाखवला पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींची स्तुती केली होती. भाजपचा पराभव करण्यासाठी देशात छोट्या पक्षांनी मोठ्या पक्षांसोबत उभे राहिले पाहिजे. उत्तरप्रदेशात मायावती, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी तसेच तामिळनाडूत सध्या डीएमकेचा वाद असला तरी या पक्षांना विचारधारेच्या आधारावर एकत्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पंतप्रधानपद ठरवणे सध्या जास्त महत्वाचे नसून भाजपला सत्तेतून पायउतार करणे महत्वाचे आहे, असे पवार यांनी म्हटले होते. यावर खरगे यांनीही बकरी ईद मे बचेंगे तो मोहरम मे नाचेंगे असे म्हटले आहे.