२०१६ मध्ये पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक झाले ; लष्करातील अधिकाऱ्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय पक्षांनी काहीही दावा केला तरी पहिल्यांदा सर्जिकल २०१६ मध्येच झाल्याचे मत लष्करातील जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले कि, काही दिवसांपूर्वी डीजीएमओने एका माहिती अधिकाराच्या अर्जाला उत्तर देताना म्हंटले होते कि सप्टेंबर २०१६ मध्ये एकच सर्जिकल स्ट्राइक झाली आहे. राजकीय पक्ष काहीही म्हणोत, सरकार त्यांना उत्तर देईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजीव शुक्ला यांनी दावा केला होता कि युपीए सरकारच्या काळात ६ वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देखील युपीएच्या काळात सर्जिकल स्ट्राईक झाल्याचे मत व्यक्त केले होते.

लेफ्टनंट जनरल म्हणाले कि, पाकिस्तानच्या बालाकोट येथे झालेला हवाई हल्ला हे भारतीय वायुसेनेचे मोठे यश होते. त्या हवाई हल्यात भारतीय विमानांनी शत्रूच्या क्षेत्रात जाऊन दशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी हवाई हल्ला केला पण त्या हल्ल्याला आपण सडेतोड उत्तर दिले. या वर्षी आपल्या जवानांनी ८६ दशतवाद्यांना ठार केले. २० दशतवाद्यांना अटक केली. दशतवाद्यांविरोधात अशाच पद्धतीने कारवाई चालू राहील.