PM मोदींच्या ‘स्कीम’चा देवाने देखील घेतला ‘लाभ’, ‘व्याज’ म्हणून मिळालं ७० किलो सोनं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात श्रीमंत तिरूपति बालाजी देवस्थानाने मोदी सरकारच्या एका स्कीमचा फायदा घेत व्याजाच्या स्वरूपात तब्बल  किलोचे सोने कमावले आहे. झाले असे की तिरुपती मंदिरात २०१६ साली सरकारने गोल्ड मॉनिटायझेशन स्कीमच्या अंतर्गत पंजाब नॅशनल बँकेमध्ये १ हजार ३११ किलो सोने जमा केले होते. सोने ठेवल्यानंतर मंदिराला गोल्ड मॉनिटायझेशनचच्या स्कीम अंतर्गत बँकेत सोने ठेवल्यानंतर त्यावर व्याज म्हणून ७० किलो आधिक सोने मिळाले आहे.

तिरूपती मंदिराकडे आहे तब्बल ९ हजार २९५ किलो सोने
आंध्रप्रदेशातील आणि जगातील सर्वात श्रीमंत मंदिराकडे तब्बल ९ हजार २५९ किलोपेक्षा आधिक सोनं आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थान संस्थेचे ५ हजार ३८७ किलो सोने SBI आणि १ हजार ९३८ किलो सोने इंडियन ओव्हसीज बँकेत गोल्ड डिपॉजिट स्कीममध्ये जमा आहे.

काय आहे गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम
या गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम अंतर्गत तुम्ही तुमचे सोने बँकेत जमा करु शकतात. यावर बँक तुम्हाला व्याज देईल, या स्कीमची विशेषता म्हणजे यात गुंतवलेले सोने बँक लॅकरमध्ये ठेवते. आणि तुम्हाला स्वत:ला लॅकर घेण्याची गरज देखील लागत नाही तसेच निश्चित व्याज देखील मिळते. या स्कीम अंतर्गत कमीत कमी ३० ग्राम ९९५ शुद्धता असलेले सोने बँकेत ठेवता येते. यात आपण बँकेत गोल्ड बार, सोन्याची नाणी, दागिने ठेवण्यास बँक मंजूरी देते.

२.५ टक्कांपर्यंत मिळेल व्याज
यात विविध काळासाठी सोने जमा करता येते. जसे की १ वर्ष ३ महिने, २ वर्ष ४ महिने ५ दिवस. ह्या स्कीम अंतर्गत बँक ग्राहकांना पडून असलेले सोने काही काळासाठी बँकेत ठेवण्याची परवानगी देते. यावर व्याज म्हणून २.२५ ते २.५० एवढे टक्के व्याज मिळते.

व्याजाच्या बदल्यात सोने देखील आणि रोख देखील
व्याजाच्या स्वरुपात आपण सोने किंवा रोख रक्कम देखील घेऊ शकतात. व्याजावर आलेल्या रक्कमेवर बँक कोणताही कर घेत नाही. उदाहरणार्थ, जर कोणी ग्राहक शॉर्ट टर्मसाठी बँकेत १०० ग्रॅम सोनं ठेवेल तर त्याला त्या बदल्यात 1१टक्का व्याज मिळेल. म्हणजेच त्याला त्याच्या खात्यात १०१ ग्राम सोनं उपलब्ध होईल.

सिनेजगत

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

हे काय, अरबाज आणि मलायका पुन्हा ‘एकत्र’ ?

ती माझ्या पती’सोबत’ होती, तिला मुलगी कशी म्हणू ; आदित्य पांचोलीच्या पत्नीचा कंगनावर ‘निशाणा’

..म्हणून अभिनेत्री ईशा गुप्‍ता भडकली ‘आधार कार्ड’च्या प्राधिकरणावर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like