राज-उद्धव एकत्र येतील काय? राज यांचे अवघ्या 2 शब्दात मार्मिक उत्तर, म्हणाले….

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्याच्या राजकारणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का? हा प्रश्न सर्वांच्या भावनिक जिव्हाळ्याचा होऊन बसला आहे. राज ठाकरे यांना मंगळवारी (दि. 1) एका वेबिनारमध्ये पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ठाकरे यांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवत परमेश्वरालाच (God) ठाऊक असे उत्तर दिले. त्यावर तुम्ही परमेश्वराला (God) मानता का? असा सवाल करण्यात आला. तेव्हा, म्हणजे काय? परमेश्वराला (God) मानतो म्हणूनच परमेश्वरालाच ठाऊक असे म्हणालो, अशी हजरजबाबी प्रतिक्रियाही राज यांनी दिली.

Diabetes In Children : कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर

त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येणार का? याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

सध्या कोरोनामुळे नेमक काय चालले आहे काहीच कळत नाही. तुमच्या हातात काहीच नाही.

आता दुसरी लाट येऊन गेली. मग पुन्हा तिसरी लाट येईल. मग पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले जाईल.

त्यामुळे काहीच ठोस तुम्ही सांगू शकत नाही. कोरोनाच्या संकटातून समाज बाहेर यावा, बाकीच्या गोष्टी होत राहतील, असे ठाकरे म्हणाले.

फायद्याची गोष्ट ! फक्त 5 हजार गुंतवून 50 हजार कमवण्याची संधी ! सुरू करा ‘हा’ बिझनेस, मोदी सरकार सुद्धा करेल मदत; जाणून घ्या

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतील युतीबाबत ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, सध्या तुमच्या हातात काहीच नाही.

त्यामुळे खरे काही सांगता येत नाही.

राज्यात सध्या नेमकं कोण राजकीय विरोधक आणि कोण मित्र हेच कळत नाही. कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे समजत नाही.

जेव्हा वेळ येईल तेव्हा बघू, असे ठाकरे म्हणाले.

निवडणुका येईपर्यंत मनसेची वाटचाल एक पक्ष म्हणून असेल आणि हा मला डोळा मारतोय का, तो पत्र पाठवतोय का, यावर माझी वाटचाल नसेल, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

कोविड-19 ची व्हॅक्सीन तुम्हाला किती काळापर्यंत सुरक्षित ठेवू शकते?, जाणून घ्या

Pune : डेक्कन परिसरातील एका शाळेच्या मैदानावर तरुणाचा खून

Pune : तरुणाचा गळादाबून आणि डोक्यात वार करून खून ! मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळला; सिंहगड रोड परिसरातील घटना