‘गोडसे मुर्दाबाद’ ! ‘हॅशटॅग’ ट्विटरवर ‘ट्रेंडिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ट्विटरवर सध्या गोडसे मुर्दाबाद असा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला 15 नोव्हेंबर रोजी फाशी देण्यात आली होती. या फाशीला 70 वर्षे पूर्ण झाल्याने गोडसे मुर्दाबाद हा हॅशटॅग ट्रेंड करताना होत आहे. आतापर्यंत 55 हजारांहून अधिक लोकांनी हा हॅशटॅग वापरून पोस्ट शेअर केल्या आहेत.

नथुराम गोडसेनं 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या केली होती. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी नथुरामला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी नथुरामसह त्याच्या इतर साथीदारांना अटक केली. या सगळ्या आरोपींवर खटला चालवण्यात आला. यातील काहीजण निर्दोष सुटले. नथुराम गोडसेला गांधीजींची हत्या केल्या प्रकरणी आणि इतरांना या कटात सामील केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा देण्यात आली. 15 नोव्हेंबर 1949 रोजी नथुरामला अंबाला तुरुंगात फाशी देण्यात आली.

शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रोजी या घटनेला 70 वर्षे पूर्ण झाली. याबद्दल नथुराम गोडसेचा निषेध केला जात आहे. ट्विटर इंडियावर गोडसे मुर्दाबाद हा हॅशटॅग सध्या ट्रेंड करताना दिसत आहे.

Visit : Policenama.com