Gokul Dudh | गोकुळ दुधाच्या ‘खरेदी-विक्री’त 2 रुपयांनी वाढ

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Gokul Dudh | म्हैस दूध प्रतिलिटर 2 रुपये व गाय दूध 1 रुपये खरेदी दरात गोकुळ दुध संघाने वाढ केली आहे. तसेच फुल क्रीम दूध विक्री दरात 2 रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. ही वाढ 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. (Gokul Dudh)
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाची संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर त्यामध्ये ही वाढ 1 ऑगस्ट पासून लागू केली जाईल, अशी माहिती संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील (Vishwas Patil) यांनी शनिवारी दिली. म्हैस दूध (Milk) खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एसएनएफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर 45.50 रुपये दर राहील. गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर 30 रुपये दर राहील. (Gokul Dudh)
कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्ये (Kolhapur, Mumbai, Pune) वितरीत होणार्या फुल क्रीम दूध विक्री दरात 2 रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे.
गाय दूध, टोण्ड दूध, स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत येणार आहे.
Web Title :- Gokul Dudh | increase in purchase and sale of gokul milk by two rupees
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा
Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर