‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांना धक्का; विरोधकांकडून सर्वात आधी विजयाचा गुलाल

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक नुकतीच पार पडली. आता मतमोजणी सुरू असून, निकालाचे कल येत आहेत. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीतही सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर आहेत. विरोधी गटातील सुजित मिनचेकर 346 मतांनी विजयी झाले आहे. तर अमर पाटील 436 मतांनी विजय मिळवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघात कोण सत्ताधारी असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सुरू असून, निकालाचे कल आता हाती येत आहे. विरोधी गटाने विजयाचा गुलाल उधळला आहे. दोन उमेदवार विजयी झाले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत देखील सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर आहे. विरोधी गटाने विजयाचे खाते उघडले आहे. विरोधी गटातील सुजित मिनचेकर 346 मतांनी विजयी झाले आहे. तर अमर पाटील 436 मतांनी विजय मिळवला आहे.

दूध संघाच्या संचालकपदासाठी कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत मोठी चढाओढ असते. या दूध संघाच्या निवडणुकीत गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करणार्‍या दूध संस्थांच्या ठरावाला मोठे महत्त्व असते. त्यामुळे विद्यमान मंत्री आणि आमदार मोठी ताकद वापरून हे ठराव गोळा करत आहेत. काही गटांमार्फत यापूर्वीच हे ठराव गोळा करण्यात आले आहेत.

दरम्यान, गोकुळ दूध संघासाठी 2 मे रोजी मोठ्या चुरशीने मतदान झाले होते. त्यानंतर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सत्ताधारी गटाकडून शाहू पॅनलखाली उमेदवार मैदानात आहे. तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभे करण्यात आले आहे. सुरुवातीपासून विरोधी गट आघाडीवर आहे.