Gokul Milk Price Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! गोकुळ दूध 4 रुपयांनी महागले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Gokul Milk Price Hike | सर्वसामान्य माणूस महागाईच्या छत्र छायेतच जगताना दिसत आहे असंच म्हणावं लागत आहे. एकीकडे इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच आता दूध (Gokul Milk) महागणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळ दूध संघाने दुधाच्या दरामध्ये 4 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आणखी सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.

 

आज (शुक्रवार) गोकूळ संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत गोकुल दुधाच्या किमतीत 4 रुपयांनी वाढ करण्यात आलीय. म्हशीच्या दूध विक्री किमतीमध्ये लिटरमागे 4 रुपयांची वाढ केली गेली आहे. त्यामुळे आता 1 लिटर दुधासाठी 58 रुपये मोजावे लागणार आहे. आजच्या बैठकीत केलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे.

 

दरम्यान, मार्चमध्ये अमूल (Amul), पराग (Parag) आणि नंतर मदर डेअरीने (Mother Dairy) दुधाचे दर लिटरमागे 2 रुपयांनी वाढवले होते. मध्य प्रदेशातल्या सांची या कंपनीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली. आता गोकूळ दूध देखील महागलं आहे. ही दरवाढ शनिवारपासून लागू होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर याआधी गोवर्धन गोल्ड मिल्कचा (Gowardhan Gold Milk) दर आता 48 रुपयांवरून 50 रुपये झाला आहे. टोन्ड व्हरायटी सह गोवर्धन फ्रेशचा (Gowardhan Fresh) भाव 46 रुपयांवरून 48 रुपयांवर झाला.

 

Web Title :- Gokul Milk Price Hike | gokul milk price hike by rs 4 rupeess in all over maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा