Gokul Milk Rate Hike | महागाईच्या झळा कायम; गोकुळने केली दूध दरात वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महागाईने सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले असताना आता नवीन दूधदर (Gokul Milk Rate Hike) वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात (Gokul Milk Rate Hike) मागच्या तीन महिन्यांतील दुसरी भाववाढ केली आहे. गोकुळने गायीच्या दुधामध्ये एका लिटरमागे 3 रुपयांची वाढ केली आहे, तर अर्धा लिटर दूध 2 रुपयांनी महागले आहे.

 

ही दरवाढ कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून म्हणजेच गोकुळकडून मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे गोकुळच्या गाईच्या दूध दर आता प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे. ६ डिसेंबरपासून नवे दर लागू होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.

 

मात्र, गोकुळ ब्रँडच्या फुलक्रिम दुधाच्या विक्री दरात कोणताही बदल झालेला नाही. ही दरवाढ नाइलाजास्तव करावी लागत असल्याचे गोकुळ दूध संघाने म्हटले आहे.

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा