Gokul Milk Election Results :सतेज पाटील- हसन मुश्रीफ यांच्या गटातील 3 उमदेवार विजयी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर जिल्हा सहकारी गोकुळ दूध उत्पादक संघाची निवडणूक रविवारी पार पडली गेली. आज मंगळवारी सकाळी आठपासून या निकालाला सुरुवात झाली आहे. गोकुळ दूध संघाच्या अतिशय अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील- मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटातील उमदेवार असणारे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, अमरसिंह यशवंत पाटील, आणि बयाजी देऊ शेळके हे ३ उमदेवार विजयी झाले आहेत.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पहिले ३ निकाल राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या बाजूने लागले आहे. या आघाडीचे मागास उमेदवार अमरसिंह पाटील हे ४३६ मतांनी विजयी झाले. आणि मागासवर्गीय उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर हे ३४६ तर बयाजी शेळके हे २३९ मतांनी विजयी झाले आहेत. या दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी निकाल कसबा बावडा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी सुरु आहे.