‘गोकुळ’ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळल्याने प्रचंड खळबळ

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन –   गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आला आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. शिंदे यांनी आत्महत्या केली की, अपघात झालाय किंवा काही घातपात झालाय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते.

भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. उशीरापर्यंत ते घरी आले नाही. त्यामुळं कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मोदी स्मशान भूमीकडे जाणाऱ्या पुलावरून एका व्यक्तीचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. नंतर हा मृतदेह शिंदे यांचा आहे याची नातेवाईकांनी खात्री केली.

भगवान शिंदे यांच्या अशा अचानक जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान शिंदे यांनी आत्महत्या केली की, त्यांचा खून झाला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.