Gold and Silver Price | सोने पुन्हा महागले, पहा तुमच्या शहरातील किंमती

मुंबई : पोलीसानामा ऑनलाईन – Gold and Silver Price | भारतात लग्नसराईच्या काळात सोने चांदीची (Gold And Silver) खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. आता भारतात लग्नसराईचा काळ सुरु झाला असताना सोन्याच्या किमतीत अंशतः वाढ झाली आहे. सोन्याची (Gold) किंमत ०.३० टक्क्यांनी वाढली (Prices Increased) आहे. चांदीचे (Silver) दर मात्र कमी (Prices Reduced) झाले आहेत. सोन्याचे फ्युचर्स दर 24 कॅरेट सोन्यासाठी 53,090 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,100 रुपये आहे. (Gold and Silver Price)

स्पॉट सोने दर 0059 GMT नुसार प्रति औंस (28.3५ ग्राम) $1,633.69 इतकी होती, सोन्याने 21 ऑक्टोबरपासूनची सर्वात कमी पातळी गाठली होती. अमेरिकेतील सोन्याचे (Gold) फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सोन्याचे (Silver) दर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस (28.3५ ग्राम) झाली आहे.

तुम्ही तुमच्या घरी बसून सोन्याचे दर तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुमच्या शहरातील सोने चांदीची किंमत तपासू शकता. तुम्ही नंबरवरून मिस कॉल केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल.

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :

शहर                           सोने                    चांदीचा दर
मुंबई                          48,666               62,100
पुणे                           48,657               62,160
नाशिक                       48,657               62,160
नागपूर                       48,657               62,160
दिल्ली                        48,583               62,100
कोलकाता                    48,611               62,120

Web Title :-  Gold and Silver Price | gold rate today gold and silver price in on 16th november 2022 gold and silver rate hike

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | …म्हणून मुलानं केलं आईसोबत भयंकर कृत्य; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे