सोनं – चांदी ‘महागलं’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोन्याच्या किंमतीत आज तेजी आली आहे. दिल्लीत सराफ बाजारात सोनं 50 रुपयांनी महागलं. सोन्याबरोबरच चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली आहे. औद्योगिक क्षेत्रात मागील वाढल्याने चांदीच्या किंमतीत तेजी आली, त्यामुळे चांदी 234 रुपयांनी महागली.

सोन्याचे दर
सोमवारी दिल्लीत सराफ बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 38,698 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. सोमवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 1,475.7 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 17 डॉलर प्रति औंस झाली.

चांदीचे दर
सोन्याच्या बरोबरीने चांदीच्या दरात देखील तेजी आली. दिल्लीत सराफ बाजारात चांदी 234 रुपयांनी महागली, त्यामुळे चांदी 45,460 रुपयांवर पोहचली.

सोन्या चांदीच्या दरात का येत आहे तेजी –
HDFC सिक्योरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की पॉजिटिव्ह ग्लोबल ट्रेंड आणि रुपया कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात तेजी आली आहे. ते म्हणाले की सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी घसरला.

नव्या वर्षी लागू होईल सोन्याच्या दागिण्यासाठी नवे नियम –
सोन्याच्या दागिण्यांवर 15 जानेवारी 2021 पासून हाॅलमार्किंग असणे अनिवार्य असेल. परंतू यासंबंधित नोटिफिकेशन 15 जानेवारी 2020 मध्ये जारी करेल. म्हणजे स्पष्ट आहे की सराफांना हा नियम लागू करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. बीआयएस कायद्याच्यानुसार हॉलमार्किंगचे नियम तोडणाऱ्यांवर कमीत कमी 1 लाख रुपयांच्या दागिण्यांच्या रक्कमेच्या 5 टक्के दंड आणि 1 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/